वारी परिवाराच्यावतीने भागवली जात आहे पक्ष्यांची भूक व तहान ; मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे जागतिक चिमणी दिवस साजरा...

वारी परिवाराच्यावतीने भागवली जात आहे पक्ष्यांची भूक व तहान...

मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे जागतिक चिमणी दिवस साजरा...

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे मानवासह पक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे या कडक उन्हात पाण्यावाचून पक्ष्यांचे हाल होत असताना असताना मंगळवेढ्यातील वारी परिवाराने मात्र जागतिक चिमणी दिनानिमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या परिसरात वारी परिवारानेच लावलेल्या झाडांना पक्षांसाठी भांडी लावून चारा व पाण्याची व्यवस्था करून पक्षांप्रती आपली जबाबदारी पार पाडली आहे.

 सद्यस्थितीत वारी परिवाराचे पक्षी वाचवा,निसर्ग वाचवा अभियान सुरु असुन पक्ष्यांविषयी जनजागृती करण्यात येत आहे.निसर्ग साखळीत पक्ष्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे पक्ष्यांचे संगोपन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.
 यावेळी झाडे लावा झाड जगवा,पक्षी वाचवा निसर्ग वाचवा,चिमणी वाचवूया पर्यावरण जपूया असा संदेश देऊन पक्ष्यांविषयी जनजागृती करण्यात आली समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या चिमण्या,पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल व पर्यायाने निसर्ग व पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल शिवाय मुलांमध्येही आवड निर्माण होऊन त्यांच्याकडून निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न होईल.पक्ष्यांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात अशा छोट्या-छोट्या उपक्रमांद्वारे निसर्गाची काळजी घ्यावी. या उपक्रमामुळे मंगळवेढा परिसरात पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.यावेळी सदर उपक्रमाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांनी कौतुक करून इतरांनीही या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे,पोलीस हवालदार राहुल कोरे,महिला पोलीस नाईक रुपाली दौंडे,सुमित जाधव,राहुल आवताडे,सुजित मुदगुल,निकिता जाधव,अनन्या मुदगुल,सिद्धेश्वर शिंदे,माणिक गुंगे,भारत नागणे,दत्तात्रय भोसले,चंद्रकांत चेळेकर,रतिलाल दत्तु ,प्रफुल्ल सोमदळे,परमेश्वर पाटील,स्वप्निल टेकाळे,प्रा विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदी पक्षीप्रेमी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.