मंगळवेढा / प्रतिनिधी :-
मानवसेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे या हेतूने मंगळवेढा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सौजन्यातून तयार करण्यात आलेल्या वैकुंठ रथाचे रविवार दि २२ मार्च रोजी लोकार्पण करण्यात आले.
सदर रथाचे उदघाटन जिजामाता पतसंस्थेच्या चेअरमन आशाताई नागणे व जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले.सोलापूर रोडवरील व निमजग्याजवळ असलेल्या दोन्ही स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठी रात्री,अपरात्री,पावसाळ्यात तसेच कडक उन्हाळ्यात प्रेतयात्रा नेताना सर्व सामान्य लोकांना अनेक अडचणीचां सामना करावा लागत असे हिच अडचण ओळखुन जिजामाता पतसंस्थेने मात्र सामाजिक बांधिलकी जपत अतिशय माफक दरात वैकुंठ रथाच्या माध्यमातून सेवा पुरवण्याचे महत्वपूर्ण कार्य हाती घेतलेले आहे.सामाजिक एकता जपणाऱ्या मंगळवेढा शहरातील सर्व जाती धर्माच्या लोकांना सदर वैकुंठ रथाचा वापर करता येणार असुन जिजामाता प्रतिष्ठानने सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपलेली आहे.
यावेळी जिजामाता प्रतिष्ठानचे रामकृष्ण नागणे,उपाध्यक्ष शिवाजी सोमदळे,प्रा विनायक कलुबर्मे, अजित शिंदे,रामचंद्र जाधव,जनार्धन उन्हाळे,संचालिका विद्या जावळे,सीताबाई जाधव,तेजस्विनी दत्तू,मंगल मुदगुल,कमल गवळी,सत्यभामा भीमदे,मालन सोमदळे,जयश्री मेटकरी,व्यवस्थापक श्रीकांत जाधव, मोहन मेटकरी,ज्ञानेश्वर भीमदे,रामचंद्र गवळी,अजित दत्तू,अजित सावंत,महेश दत्तू,तुकाराम भगरे,विजय हजारे,शिवराज उप्पेवाड,सुभाष उप्पेवाड यांचेसह जिजामाता पतसंस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.