ढवळस गावातून रमेश जी भांजे यांच्या प्रचारार्थ होम टू होम मतदारांच्या गाठीभेटी ;भाजपाच्या संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रमेश जी भांजे यांची प्रचारात मोठी आघाडी ...

ढवळस गावातून रमेश जी भांजे यांच्या प्रचारार्थ होम टू होम मतदारांच्या गाठीभेटी...

भाजपाच्या संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रमेश जी भांजे यांची प्रचारात मोठी आघाडी ...

मंगळवेढा /प्रतिनिधी :-

 मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटांमध्ये ढवळस गावातून होम टू होम प्रचार करत भाजपाचे जिल्हा परिषद गटातून उमेदवार रमेश जी भांजे व पंचायत समिती गणातून सौ.सविता कोकरे यांच्या प्रचारार्थ उमेदवार सौ.सविता कोकरे, युवक नेते शंकर रमेश भांजे, सौ.शोभा रमेश भांजे, रोहिणी भांजे,शारदाबाई भैरगोंड,वैशाली भांजे, राणी भांजे यांच्या शुभहस्ते ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी मंदिरातून नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला.
गावातून महिलांनी घरोघरी जाऊन पत्रक वाटप करत संत दामाजीनगर गटातील उमेदवार रमेश जी भांजे यांच्या सामाजिक हिताच्या कार्याची माहिती सांगत,त्यांनी नागरिकांच्या पाणीपुरवठा,रस्ते, वीज,आरोग्य शिक्षण या अडचणी समस्या नागरिकांच्या होम टू होम जाऊन प्रत्यक्ष गाठीभेटी घेत जाणून घेण्यात आल्या.

यावेळी गावातील महिलावर्ग,सर्व आजी-माजी पदाधिकारी, मतदार बंधू-भगिनी, नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.