मंगळवेढा येथील संत दामाजी नगर सप्तशृंगी मंदिरात प्रचाराचा भव्य शुभारंभ...
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
सोलापूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटातील उमेदवार श्री.रमेश जी श्रीमंत भांजे व पंचायत समिती गणातून सौ.सविता मधुकर कोकरे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथील सप्तशृंगी मंदिरात सप्तशृंगी देवीस पुष्पहार व श्रीफळ वाहून प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष मोगले,भाजप शहराध्यक्ष नागेश डोंगरे, माजी संचालक राजन पाटील, संत दामजीनगर सरपंच जमीन सुतार, उपसरपंच संजय जगताप, पिंटू मोहिते, दिलीप वाडेकर, ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब आसबे, विजय जाधव, बसवराज माळी, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गायवाड, शिवाजी नागणे, मधुकर बेदरे, ज्ञानेश्वर वाघमारे, दासू काका शिंदे, अरुण भोसले, बठाण सरपंच बिबीशन बेदरे, दत्तात्रय बेदरे, संजय बाबर ,अरळी माजी सरपंच मल्लिकार्जुन भांजे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गंगाधर काकणगी,विश्वनाथ पावले,आकाश राजमाने आदीजण तसेच संत दामाजीनगर गटातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, मतदार बंधू-भगिनी, नागरिक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.