विकासाच्या वाटा वेगवान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळाला साथ द्या- करुणा शिवशरण ; लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

विकासाच्या वाटा वेगवान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळाला साथ द्या- करुणा शिवशरण 

लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील भाजपा उमेदवारांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद...  

मंगळवेढा /प्रतिनिधी :- 

पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सरकार तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे नेतृत्वाखाली मतदारसंघातील जनतेच्या प्रगतीचे पर्व म्हणजेच विकासाचा मानबिंदू अजून काही महिने किंवा काही वर्षांचा विचार न करता पुढील शंभर वर्षांचा विचार करून हे सरकार दीर्घकालीन योजना राबवत आहे म्हणूनच जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण भाजपासोबत राहून विकास करणाऱ्या नेतृत्वाला साथ द्यावी असे आवाहन जिल्हा परिषद लक्ष्मी दहिवडी गटाच्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार करुणाताई जनार्धन शिवशरण यांनी केले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा परिषद लक्ष्मी दहिवडी गटातील पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनायक माधवराव यादव व चोखामेळानगर गणाचे अधिकृत उमेदवार दिपालीताई आनंदराव ताड यांच्यासमवेत गटातील विविध गावांमध्ये भेटीच्या निमित्ताने झंझावाती दौरा केला, यावेळी त्या बोलत होत्या.

 पुढे बोलताना करुणाताई शिवशरण म्हणाल्या की, येत्या काळात रस्ते,वीज, पाणी,शिक्षण, आरोग्य,कृषी,सहकार, उद्योग अशा सर्व क्षेत्रात चौफेर विकास करत आपल्याला पुढे जायचे आहे. यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक मध्ये आपण भारतीय जनता पार्टीला साथ द्या, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाच्या काळात मी तुमच्यासोबत असेल, तुमच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेन, तुमची सेवा व तुमचा विकास आणि तुमचे कल्याण हाच माझा वचननामा असेल. ही निवडणूक नव्या पर्वाची नांदी असेल, नव्या विकास पर्वाची पहाट असेल त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता विकासाचे व्हिजन असलेल्या उमेदवारांना म्हणजेच लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना साथ द्या अशी साद त्यांनी यावेळी मतदारांना घातली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.