मंगळवेढा येथील एकविरा आई माळावरील घटनेबाबत सभागृहात आमदार समाधान आवताडे यांची ठाम भूमिका ; संत नगरीचे अध्यात्मिक वैभव अबाधित ठेवण्यासाठी योग्य कार्यवाहीची आ.समाधान आवताडे यांनी केली मागणी ...

मंगळवेढा येथील एकविरा आई माळावरील घटनेबाबत सभागृहात आमदार समाधान आवताडे यांची ठाम भूमिका... 

संत नगरीचे अध्यात्मिक वैभव अबाधित ठेवण्यासाठी योग्य कार्यवाहीची आ.समाधान आवताडे यांनी केली मागणी ...


मंगळवेढा / प्रतिनिधी :-

मंगळवेढा तालुक्यातील एकविरा आई माळावर अज्ञात मध्यपी व्यक्तीकडून आग लावण्याची दुर्दैवी घटना घडली. त्यावेळी संबंधित निवासी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. तसेच मंदिरातील पितळी घंटा चोरी झाल्याची बाबही समोर आली असून त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी हा विषय उपस्थित करून मंत्री महोदयांचे लक्ष वेधले.

🛑 आमदार समाधान आवताडे यांनी पुढील मुद्दे ठळकपणे मांडले :-

मंदिर परिसरातील निवासस्थानी वास्तव्यास नसलेल्या अधिकाऱ्यांवर कर्तव्याबाबत कसूर केल्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का?

आगीत जळून खाक झालेल्या सुमारे अडीच हेक्टर क्षेत्रावर नव्याने वृक्षारोपण करण्यासाठी शासनाचा विशेष कृती आराखडा आहे का?

या कामासाठी तातडीने किती निधी मंजूर करण्यात येणार आहे?, 

मंदिर परिसरात घुसखोरी व चोरीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि वनरक्षकांच्या गस्तीमध्ये वाढ करण्याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येणार का?

या संपूर्ण प्रकरणाबाबत वनमंत्री ना.गणेश नाईक यांनी संवेदनशील भूमिका मांडत मंदिर परिसराच्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलण्याची हमी सभागृहात दिली. तसेच, भाविकांच्या श्रद्धास्थानाचे रक्षण आणि पर्यावरणाचे पुनरुज्जीवन यासाठी शासनाकडून तातडीने कार्यवाही होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.