छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून प्रेरित हे महाराजस्व अभियान म्हणजे जनतेशी थेट नातं जोडणाऱ्या लोकाभिमुख प्रशासनाचे खरे दर्शन - आमदार समाधान आवताडेt

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून प्रेरित हे महाराजस्व अभियान म्हणजे जनतेशी थेट नातं जोडणाऱ्या लोकाभिमुख प्रशासनाचे खरे दर्शन - आमदार समाधान आवताडे 

मंगळवेढा / प्रतिनिधी : -

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून प्रेरित हे महाराजस्व अभियान म्हणजे जनतेशी थेट नातं जोडणाऱ्या लोकाभिमुख प्रशासनाचे खरे दर्शन असल्याचे मत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराची आढावा बैठक आ आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली.

 सदरप्रसंगी आ.आवताडे हे उपस्थित नागरिक, अधिकारी व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, ती फक्त भौगोलिक स्वरूपाची नव्हती, तर ती रयतेच्या सुख-समृद्धी आणि न्यायाची होती. त्यांनी प्रशासनाला नेहमीच लोकाभिमुख ठेवले. त्याच विचारांना उजाळा देत, महाराष्ट्र शासनाने राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान - समाधान शिबीर सुरू केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. शासनाच्या या लोकाभिमुख उपक्रमाचा फायदा मंगळवेढा तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित असलेल्या नागरिकांच्या सर्व अडचणींचे निराकरण करावे, नागरिकांची अडवणूक होऊ नये यासाठी सतत प्रयत्नशील रहावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, अनेक लाभार्थ्यांना थेट शासकीय योजनांचे लाभ मिळाले. सदर उपक्रमाच्या माध्यमातून शासन थेट जनतेच्या दारी पोहोचत असल्याने हा उपक्रम म्हणजे राज्य महसूल खात्याच्या गतिमान कार्य सक्षमतेचे महत्वपूर्ण पाऊल आहे.

शिबिरामध्ये यावेळी प्रांताधिकारी श्री. बी आर माळी, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, तहसीलदार मदन जाधव, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, जिल्हा परिषद सदस्य रमेश भांजे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, संचालक औदुंबर वाडदेकर, पोलीस उपनिरीक्षक बनकर सो, उद्योजक सरोज काझी यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, तसेच भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.