रड्डे पंचायत समिती गणातून भाजपकडून आकाश डांगे यांची उमेदवारी निश्चित...

रड्डे पंचायत समिती गणातून भाजपकडून आकाश डांगे यांची उमेदवारी निश्चित...

मंगळवेढा / प्रतिनिधी :- 

भोसे जिल्हा परिषद गटातील रड्डे पंचायत समिती गणातून भाजप यूवा मोर्चाचे तालूकाध्यक्ष आकाश डांगे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची जोरदार शक्यता वर्तवली जात असून, याबाबत चर्चेला वेग आला आहे. सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून ओळख असलेले आकाश डांगे यांना आमदार समाधान आवताडे यांच्या गटाकडून उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.

आकाश डांगे यांच्या नावाची शिफारस

आमदार समाधान आवताडे यांनी नुकतीच मंगळवेढा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मृलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींमध्ये रड्डे पंचायत समिती गणातून अनेक इच्छुकांनी आपली बाजू मांडली.

 मात्र संघटनात्मक बांधणी, जनसंपर्क, युवकांमध्ये असलेली लोकप्रियता आणि सामाजिक कार्याचा अनुभव या सर्वच बाजूंनी आकाश डांगे सक्षम ठरत असल्याने त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान रड्डे पंचायत समिती गणातील बहुतांश गावातील आ.समाधान आवताडे गटाच्या प्रमुख नेत्यांनी आकाश डांगे यांच्या उमेदवारीची शिफारस केली असल्याचीही माहिती मिळत आहे.

सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर

गेल्या अनेक महिन्यांपासून आकाश डांगे यांनी रड्डे पंचायत समिती गणातील रड्डे, तसेच गणात समाविष्ट असलेल्या इतर गावांमध्ये सातत्याने संपर्क ठेवला आहे. स्थानिक प्रश्न, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांनी अनेक ठिकाणी थेट सहभाग घेतल्याचे दिसून येते.

आ. समाधान आवताडे यांचा विश्वासू कार्यकर्ता अशी ओळख

भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी संघटन वाढीसाठी घेतलेली मेहनत तसेच आमदार समाधान आवताडे यांच्याशी असलेला घनिष्ठ संपर्क हे देखील त्यांच्या उमेदवारीसाठी महत्त्वाचे घटक मानले जात आहेत. आमदार आवताडे यांच्या विश्वासातील कार्यकर्ता म्हणून आकाश डांगे यांची तालुक्यात ओळख असून, त्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान उमेदवारीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी रड्डे पंचायत समिती गणात आकाश डांगे यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. जर भाजपकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली, तर रड्डे गणातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष भाजपच्या अधिकत निर्णयाकडे लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.