संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून ओबीसी आरक्षणाच्या जागेवर भाजपचा उमेदवार ठरला ; डोणज गावचे आमसिद्ध केदार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली...

संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून ओबीसी आरक्षणाच्या जागेवर भाजपचा उमेदवार ठरला...

डोणज गावचे आमसिद्ध केदार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली...

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वातून संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून ओबीसी जागेवर डोणज गावचे ज्येष्ठ नागरिक आमसिद्ध आण्णाप्पा केदार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.

रायगड जिल्हा परिषद येथे बांधकाम विभागात उपअभियंता पदावर काम करून सेवानिवृत्त झालेले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामे प्रत्यक्षात केल्याने त्यांचे कार्याचे अनुभव मतदार संघासाठी मोलाचे ठरणार आहेत.

शिक्षण घेत असताना शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतीशी निगडित प्रश्नांची जाण आहे. बोराळे, नंदुर, डोणज, भालेवाडी येथील पाझर तलावाच्या कामावर मजूर म्हणून काम केले आहे. मजूर कष्टकऱ्यांच्या यातना जाणतात. कमवा व शिका या पद्धतीने अभियंता डिग्री पूर्ण करून शासकीय सेवेत कार्यरत असताना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.

डोणज व परिसरातील गावात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना सन्मानित करण्याबरोबर शिक्षण, आरोग्य, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, नोकरी इत्यादीसाठी आर्थिक सहकार्यही केले आहे.

आमदार समाधान आवताडे यांच्या गटातून भाजप कडून संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटासाठी आमसिद्ध केदार यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित झाली असून शेतकरी,कष्टकरी, उद्योजक,व्यापारी, खेळाडू, अधिकारी ,कर्मचारी यांचे प्रतिनिधित्व करणारी असून त्यांचे राहणीमान अगदी साधी राहणी असून उच्च विचार या पद्धतीचे आहेत.

स्वतः उच्चशिक्षित अनुभवी असल्याने जिल्हा परिषदेतील विविध योजना प्रभावीपणे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. यामुळे संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून ओबीसी या जागेवर उमेदवार म्हणून आमसिद्ध आण्णाप्पा केदार यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.