लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाचा भाजपकडून करुणाताई शिवशरण यांची उमेदवारी जाहीर ; करुणाताई शिवशरण यांना लक्ष्मी दहिवडी गटातील सर्व गावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद...

लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाचा भाजपकडून करुणाताई शिवशरण यांची उमेदवारी जाहीर...

करुणाताई शिवशरण यांना लक्ष्मी दहिवडी गटातील सर्व गावांतून उत्स्फूर्त प्रतिसाद...

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

मंगळवेढा तालुक्यातील माचनूर गावच्या करुणाताई जनार्धन शिवशरण या लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार असल्याची संपूर्ण गटातील गावांमधून जोरदार मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे.लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार करुणाताई शिवशरण यांचे शिक्षण कॉम्प्युटर इंजिनियर डिप्लोमा झालेला आहे.

करुणाताई जनार्धन शिवशरण या सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या, कर्तृत्ववान, अभ्यासू आणि कामातून ओळख निर्माण करणाऱ्या नेतृत्त्व आहेत.माचानुर गावच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी गावाच्या मूलभूत गरजांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व मानवी विकासालाही समान महत्त्व दिले.

ग्रामपंचायत सदस्य असताना केलेली ठळक विकासकामे :- 

• गावातील सांडपाणी वस्तीमध्ये न साचता भुयारी गटार योजनेद्वारे गावाबाहेर नेऊन योग्य पद्धतीने जिरवण्याची व्यवस्था केली.
• गावातील अंतर्गत गल्ल्या व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून सुरक्षित, टिकाऊ व सुबक रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली.
• प्रत्येक घरासमोर नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल यासाठी प्रभावी नियोजन व अंमलबजावणी केली.
• गावामध्ये संविधान भवन उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर असून, संविधानिक मूल्यांची जाणीव व जनजागृतीसाठी हे एक महत्त्वाचे केंद्र ठरत आहे.
• गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक विकासासाठी महाकाली मंदिराचे काम सध्या सुरू असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा विकसित केल्या जात आहेत.
• स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांवर सातत्याने भर देण्यात आला.

ही सर्व विकासकामे समाधान दादा यांच्या मार्गदर्शनाखाली, लोकांचा विश्वास घेऊन आणि प्रशासनाशी योग्य समन्वय साधत पूर्णत्वास नेली जात आहेत.

सामाजिक, शेतकरी व महिला सक्षमीकरणासाठी केलेले उपक्रम :

करुणाताई जनार्धन शिवशरण यांनी केवळ भौतिक विकासावरच नव्हे तर समाजघटकांना एकत्र आणणाऱ्या उपक्रमांवरही विशेष भर दिला आहे.

• शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे आयोजित करून शेतीविषयक मार्गदर्शन, समस्या मांडणी व संवाद साधला.
• महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला मेळावे आयोजित करून आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.
• सामाजिक एकोपा आणि परंपरा जपण्यासाठी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन केले.
• किशोरवयीन मुलींसाठी किशोरी मेळावे घेऊन आरोग्य, शिक्षण, आत्मविश्वास व सामाजिक जाणीव यावर मार्गदर्शन केले.

या उपक्रमांमुळे शेतकरी, महिला, किशोरी आणि कुटुंब घटक यांचा थेट सहभाग वाढला आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

सामाजिक व सार्वजनिक भूमिका :

करुणा ताई शिवशरण (करुणाताई जनार्धन शिवशरण) या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समाजातील दुर्बल घटकांसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहिल्या आहेत. त्या भारतीय संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांवर ठाम विश्वास ठेवणाऱ्या नेतृत्त्व आहेत.

जिल्हा परिषदेसाठी दृष्टीकोन (Vision) :

• लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांचा समतोल व सर्वांगीण विकास
• पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती व रोजगार या मूलभूत विषयांवर ठोस व शाश्वत काम
• शेतकरी, महिला व युवक केंद्रस्थानी ठेवून विकासात्मक धोरण
• पारदर्शक कारभार आणि लोकसहभागातून विकास

व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये :

• साधी, स्पष्टवक्ती आणि कामावर विश्वास ठेवणारी नेतृत्त्व
• जनतेशी थेट संपर्क ठेवणारी, सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारी
• आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देणारी

ब्रीदवाक्य :

वचन नव्हे, कामातून ओळख
जनतेसाठी, जनतेतून आलेली नेतृत्त्व

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.