मंगळवेढा तहसील कार्यालय यांच्या वतीने जाहीर आवाहन - मदन जाधव

मंगळवेढा तहसील कार्यालय यांच्या वतीने जाहीर आवाहन - मदन जाधव 


मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

जिल्हा परिषद पंचायत समिती मंगळवेढा सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी दिनांक २० व २१ जानेवारी २०२६ असे शेवटचे फक्त २ दिवस बाकी आहेत.

या दोन्ही दिवशी नामनिर्देशन अर्ज विक्री आणि अनामत रक्कम भरणा तहसील कार्यालयाच्या नक्कल विभागामधून होईल. 

त्यासाठी नागरिकांनी तहसील कार्यालयाच्या नक्कल विभागाच्या पूर्वेकडील बाहेरील बाजूने असणाऱ्या खिडकीमधून विहित वेळेत नामनिर्देशन अर्ज घ्यावे आणि त्याच ठिकाणी अनामत रक्कम भरावी.

सर्व इच्छुक उमेदवार तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन मंगळवेढा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.