मंगळवेढा ते सोनारी बससेवा सुरू दर पोर्णिमेला भाविकांना सोनारसिद्ध दर्शन घडणार ; सोनारी ला जाणाऱ्या भाविकाना ऑनलाइन बुकिंग सुविधा - संजय भोसले

मंगळवेढा ते सोनारी बससेवा सुरू दर पोर्णिमेला भाविकांना सोनारसिद्ध दर्शन घडणार...

सोनारी ला जाणाऱ्या भाविकाना ऑनलाइन बुकिंग सुविधा - संजय भोसले.

मंगळवेढा / प्रतिनिधी :- 

मंगळवेढा ते सोनारी (परांडा) ही बस सेवा शनिवारी सकाळी ८ वाजता आगार प्रमुख संजय भोसले यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. ही बससेवा सुरू करावी अशी अनेक वर्षापासून भाविकांची मागणी होती. मंगळवेढ्यातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत श्री क्षेत्र सोनारी येथील  काळभैरवनाथ (सोनारसिद्ध) आहे.

 पाठखळ,खोमनाळ,मरवडे,लेंडवे चिंचाळे फटेवाडी,गोणेवाडी सह अनेक गावातील लोकांचे क्षेत्र हे असल्याने भाविकांना दर्शनासाठी मोठी कसरत करावी लागत होती.मंगळवेढा ते सोनारी हा प्रवास अनेक थांबे व बस बदलत करावा लागत होता. याबाबत मंगळवेढा आगाराला विशेष बस सेवा सुरु करावी अशी मागणी करण्यात आली.

या मागणी नंतर बस सुरू करण्यासाठी आगार व्यवस्थापक संजय भोसले यांनी सकारात्मकता दर्शवली व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिली यानुसार शनिवारी सकाळी दोन बस सोनारीकडे रवाना झाल्या आहेत. सुरवातीस मंगळवेढा बसस्थानाकावर दोन्ही एसटीचे पूजन करण्यात आले.

 या प्रवासात पंढरपूर,शेटफळ फाटा कुर्डूवाडी,परांडा ते सोनारी हा मार्ग असून भाविकाना दर पोर्णिमेला सकाळी आठ वाजता ही फेरी होणार आहे.सदर बससाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

 या प्रवासासाठी पूर्ण तिकीट: ४०४ अर्धे तिकीट:२०४ महिला सन्मान योजना: २०४ जेष्ठ नागरिक:२०४ व ७५ वय जेष्ठ नागरिक मोफत असून ही बससेवा सुरू व्हावी.

यासाठी प्रफुल्ल सोमदळे,प्रा विनायक कलुबर्मे,पत्रकार सचिन इंगळे, एड रमेश जोशी,नितीन सुरवसे,सचिन नागणे,अर्जुन नागणे,सुधीर बिले,पांडुरंग नागणे,संतोष पवार आदिनी विशेष प्रयत्न केले. 


भाविकांना एसटी बस च्या सवलतीच्या दरात आणि तत्पर सुरक्षित सेवा उपलब्ध आहे. सोनारी ला जाणाऱ्या भाविकाना ऑनलाइन बुकिंग करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
                            संजय भोसले 
                  मंगळवेढा आगार व्यवस्थापक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.