मंगळवेढा /प्रतिनिधी : -
सलगर बु. येथे समाईक विहिरीच्या पाण्याच्या पाळीचा वाद मिटविण्यासाठी आलेल्या दोन गटात हाणामारी व दोन महिलांना लज्जा वाटेल असे कत्य केल्याची घटना घडली असून या प्रकरणी परस्परविरोधी बिराप्पा हिप्परकर, विलास हिप्परकर, अंकुश हिप्परकर, अजीत हिप्परकर, यल्लाप्पा हिप्परकर , लक्ष्मण हिप्परकर, सुनिल हिप्परकर ,विनोद हिप्परकर आदी आठ जणांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलिस सत्रांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या घटनेत यातील ४८ वर्षीय फिर्यादी महिला दि.१ जानेवारी रोजी रात्री ७.३० वा. तीच्या पतीसह घरी असताना अजीत हिप्परकर याने यल्लाप्पा हिप्परकर यांचे मोबाईलवर फोन करून सांगितले की विहिरीच्या पाण्याच्या पाळीचा वाद मिटवायचा आहे,तुम्ही आमच्या घरी या असे म्हणाले.
फिर्यादीच्या पतींना आरोपीकडून शिवीगाळ होवू लागली.त्यावेळी फिर्यादीचे पती म्हणाले तु शिव्या का देतो असे म्हणताच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. फिर्यादी हिला खाली पाडून छातीवर मारून तीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.सदरच्या भांडणात फिर्यादीच्या गळयातील गंठण पडून गहाळ झाले असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
दुसऱ्या घटनेत यातील ३५ वर्षीय फिर्यादी महिला व तीचा पती घरी असताना अजीत हिप्परकर यांचा फोन पतीच्या मोबाईलवर आला. व विहिरीच्या पाण्याच्या पाळीची तक्रार मिटवायची आहे तूम्ही घरी या त्यावेळी फिर्यादीसह सर्वजण घरी गेले असता तुम्ही मोटारीच्या फ्युजा का काढता असे विचारले असता वरील चौघा आरोपीनी शिवीगाळ केली. यावेळी तूम्ही शिव्या देवू नका असे म्हणत असताना तुला लयी मस्ती आली आहे असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.यावेळी फिर्यादीस खाली पाडून कपडे ओढून छातीवर हाताने मारून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद करून फिर्यादीच्या पतीस दगडाने कमरेवर मारून जखमी केले असल्याचे म्हटले आहे.
या दोन्ही घटनेत एकमेकांविरूध्द परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिस याचा तपास करीत आहेत.