मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटल रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज अत्याधुनिक हाॅस्पीटल,ICU सह सर्व एकाच छताखाली...
मंगळवेढा /प्रतिनिधी:-
मंगळवेढा शहरातील आरोग्यसेवेत महत्त्वाची भर घालणाऱ्या बेलदार हॉस्पिटल, आय.सी.यू. अन्ड पेडियाट्रिक क्रिटिकल केअर तसेच राधाई मेडिकल स्टोअर्स यांचा भव्य उद्धाटन समारंभ रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्रीराम मार्टजवळ, शिशु विहार समोर मंगळवेढा येथे होणार आहे.
या उद्धाटन समारंभाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते उद्धाटन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रशांतराव परिचारक असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय देशमूख (रेडिओलॉजिस्ट व डायरेक्टर, लाईफ लाईन हॉस्पिटल, पंढरपूर) उपस्थित राहणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. सचिन बेलदार यांनी दिली.
या सोहळ्यास मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे, पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, माजी पालकमंत्री प्रा.डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, माजी विरोधी पक्ष नेते अजित जगताप,भैखवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळूंगे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, संत दामाजी कारखानाचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हॉइस चेअरमन तानाजी खरात, दामाजी नगरचे सरपंच जमीर सुतार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालूकाध्यक्ष पांडुरंग चौगूले हे प्रम्ख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये बालरोगतज्ञ डॉ. शितल शहा, डॉ.नीरज शहा, डॉ. कुलदीप कोलपाकवर,डॉ. प्रवीण वायकुळे, डॉ. अशोक सुरवसे, मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुलोचना जानकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब जानकर, डॉ. मधुकर कुंभारे, डॉ. सुभाष देशमुख, डॉ. शाकीर सय्यद, डॉ. सचिन बनसोडे व शेखर नेने यांचा समावेश आहे.
नवीन सुरू होणाऱ्या बेलदार हाॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक आय.सी.यू सुविधा तसेच बालरोगांसाठी स्वतंत्र क्रिटिकल केअर युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे गंभीर आजारग्रस्त रुग्ण व लहान बालकांसाठी मंगळवेढा व परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ उपचारांची सविधा मिळणार आहे. याच ठिकाणी सरू होत असलेल्या राधाई मेडिकल स्टोअर्समुळे आवश्यक औषधे एकाच छताखाली सहज उपलब्ध होणार असून, रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय टळणार आहे.
या भव्य उद्वाटन समारंभास मंगळवेढा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाऊसाहेब बेलदार, खडकीचे माजी सरपंच रघुनाथ बेलदार यांनी केले आहे.