मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटल रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटल रूग्णांच्या सेवेसाठी सज्ज आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते संपन्न...

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटल भव्य उद्घाटन सोहळा ...

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

मंगळवेढा येथे बेलदार परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या "बेलदार हॉस्पिटल – ICU & Pediatric Critical Care" तसेच राधाई मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार लोकनेते आदरणीय श्री.समाधान दादा आवताडे साहेब यांच्या हस्ते पार पडले. 

आधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि अत्याधुनिक उपचारपद्धती यांचा संगम असलेले हे रुग्णालय मंगळवेढा शहराच्या आरोग्यसेवेत एक महत्त्वाची भर घालणारे ठरणार आहे.
विशेषतः अतिदक्षता विभाग (ICU) आणि बालरोग तज्ज्ञ सेवा उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना तातडीच्या व गंभीर उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही. याबद्दल डॉ. सचिन बाबासाहेब बेलदार, डॉ. अपेक्षा सचिन बेलदार आणि कु. सागर भाऊसाहेब बेलदार यांच्यासह संपूर्ण बेलदार परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
समाजाच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारत बेलदार परिवाराने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असून, रुग्णसेवा हीच खरी समाजसेवा या भावनेतून हा उपक्रम राबवला जात असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले.
या रुग्णालयामुळे मंगळवेढा शहर व परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, विशेषतः लहान मुलांच्या गंभीर आजारांवरील उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना दूर शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होऊन वेळ, खर्च आणि मानसिक ताण कमी होईल. 
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मंगळवेढा शहरासाठी हे एक अत्यंत उपयुक्त आणि दिलासादायक पाऊल ठरेल, असा विश्वास यावेळी आमदार महोदय यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्षा मा. सौ सुनंदाआबी आवताडे, युवक नेते श्री. प्रणव मालक परिचारक, जेष्ठ मार्गदर्शक श्री. रामचंद्र दाजी जगताप, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. अजित आप्पा जगताप, माजी सभापती श्री. प्रदीप जी खांडेकर, नगरसेवक श्री. प्रवीण उर्फ चंकी खवतोडे मेंबर, श्री. सुदर्शन महाराज, श्री. कांतीलाल ताटे, श्री. काशिनाथ पाटील, श्री. विजयदादा भुसनर, नगरसेविका कु.विद्यागौरीताई सिद्धेश्वर अवघडे आदी मान्यवर सहकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

रुग्णकेंद्रित, विश्वासार्ह आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न - डॉ. सचिन बेलदार 

मंगळवेढा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांपासून ते श्रीमंतांपर्यत प्रत्येक रुग्णाला दर्जेदार व योग्य वैद्यकीय सूविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. बेलदार हॉस्पिटलच्या माध्यमातन रुग्णकेंद्रित विश्वासार्ह आणि परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा संकल्प आज उद्धाटनप्रसंगी करत असल्याची प्रतिक्रिया बेलदार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. सचिन बेलदार यांनी केलेल्या प्रस्ताविकात दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.