मंगळवेढा/प्रतिनिधी :-
ढवळस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नवनाथ गिरजाप्पा मस्के यांची तर उपाध्यक्षपदी सौ.मनिषा संतोष बावचे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी या समितीत नूतन सदस्य मधुकर गोरख हेंबाडे,राघप्पा बाबुराव पुजारी, जितेंद्र उत्तम शेंबडे, समाधान शिवाजी मस्के, सदस्या ज्ञानेश्वरी अमोल मोरे, कविता मनोज मोरे, रीमा संजय मस्के, ग्रा.पं.सदस्य पूनम संतोष गायकवाड,वनिता साहेबराव गायकवाड,रुपाली दत्तात्रय रणदिवे यांच्या निवडी करण्यात आल्या.
शाळा व्यवस्थापन समिती नूतन अध्यक्ष नवनाथ गिरजाप्पा मस्के यांचा सत्कार माजी मुख्याध्यापक देवाप्पा हेंबाडे यांनी तर नूतन उपाध्यक्ष मनिषा संतोष बावचे यांचा सत्कार ग्रा.पं.उपसरपंच सुरेखा कवडे यांनी केला.
मंगळवेढा गट शिक्षणाधिकारी दर्शन मेहता,केंद्रप्रमुख पुरुषोत्तम राठोड, यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त सरपंच रोहिणीताई सुधाकर हेंबाडे, माजी उपसरपंच अश्विनी अनिल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती नूतन अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य यांच्या निवडी करून अभिनंदनपर शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मुख्याध्यापक देवाप्पा हेंबाडे, माजी सरपंच आबासाहेब मोरे,अशोक माने, मामासाहेब कुंभार,मंगेश मोरे,शुभम हेंबाडे, आनंदा मोरे, पंपुशेठ मोरे, राजेंद्र मोरे,अमोल मोरे, संतोष मोरे,दीपक मोरे,सज्जन बावचे, मधुकर हेंबाडे, पांडुरंग हेंबाडे, कुमार हेंबाडे,संतोष बावचे, औदुंबर बावचे,विकास हेंबाडे, बापू सोलंकर,ऋषिकेश हेंबाडे, प्रशांत आगलावे,समाधान लेंडवे, नवनाथ ताटे,औदुंबर मेटकरी, समाधान बावचे,शांतीप्रसाद जाधव,प्रदीप कांबळे,अशोक माने,दीपक शेंबडे, जितेंद्र शेंबडे,सुनील मस्के,संभाजी मस्के, नवनाथ मस्के,अनिल मस्के, नितीन नागणे, समाधान मस्के, जयदीप मोरे, सिद्धेश्वर कुंभार, वसंत गायकवाड, सचिन मस्के, लखन मस्के, अमर गायकवाड,धनाजी गायकवाड, राजकुमार पोतदार, मोहन मोरे,आदी जण पालक वर्ग उपस्थित होते.
यावेळी शाळेतील शिक्षक मुख्याध्याक राजाराम बनसोडे, शिक्षक धनाजी नागणे, नागेश कोकरे, दिगंबर कुचेकर, शिक्षिका सौ.मनिषा जगताप, सौ.अनिता भिंगे, सौ.सोनल गायकवाड आदी शिक्षक प्रेमी कर्मचारी व पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक नागेश कोकरे यांनी केले.