मंगळवेढा पोलीस ठाण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणेर यांनी घेतला पदभार
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
मंगळवेढा पोलीस ठाण्यात नव्याने महिला पोलीस उपनिरीक्षक म्हणून डॉ.आरती कणेर या दाखल झाल्या असून त्यांनी आपल्या पदाचा नुकताच पदभार स्विकारला आहे.
दरम्यान , मंगळवेढा पोलीस ठाण्यात गेली अनेक वर्षें महिला पोलीस अधिकारी नसल्यामुळे गंभीर स्वरुपाच्या तक्रार घेवून येणाऱ्या महिलांचे प्रश्न सुटणे कठीण बनले होते.
मागील पाच वर्षापूर्वी येथील महिला पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. महिला अधिकारी नसल्यामुळे महिलाच्या गंभीर समस्या सोडविण्यात अडचण येत होती.
मागील दोन आठवड्यापूर्वी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी हे वार्षिक तपासणी दरम्यान मंगळवेढ्यात आल्यावर शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाने पोलीस अधिक्षक यांच्याकडे येथे महिला पोलीस अधिकाऱ्याची नितांत गरज असल्याचे सांगून तशी मागणी केली होती.
याची दखल घेण्यात आली असून महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणेर या मंगळवार दि.६ जानेवारी रोजी नाशिक येथील ट्रेनींग सेंटर वरुन थेट कोल्हापूर परिक्षेत्र विभागामधून मंगळवेढ्याला दाखल झाल्या आहेत.त्या मुळच्या कोल्हापूर जिल्हयातील इंगळी- हुपरी गावच्या असुन त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली आहे. त्या २०२१ च्या बंचच्या आहेत. मंगळवेढा पोलीस ठाण्याला एक महिला अधिकारी मिळाल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे.