मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन हेंबाडे व महेश पाटील

मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन हेंबाडे व महेश पाटील 

मंगळवेढा /प्रतिनिधी:- 

मंगळवेढा येथील शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार भवन येथे होवून अध्यक्षपदी माणगंगा मेट्रो न्यूजचे संपादक सचिन हेंबाडे तर दैनिक सकाळचे महेश पाटील यांची निवड करण्यात आली.
सुरुवातीस आद्य पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची नुतन कार्यकारणी निवडण्यात आली.यावेळी कार्याध्यक्षपदी म्हाळाप्पा शिंदे, उपाध्यक्षपदी प्रसाद कसबे,अमीर आतार, दत्तात्रय कांबळे,प्रशांत माळी, खजिनदारपदी दिगंबर गरंडे,सहकार्याध्यक्षपदी महेश वठारे, सहखजिनदारपदी राहुल मस्के व प्रसिध्दी प्रमुखपदी येताळा खरबडे यांची निवड करण्यात आली.
सदर प्रसंगी माजी अध्यक्ष ऑड.दत्तात्रय तोडकरी व भिमराव मोरे यांनी आपले विचार व्यक्त केले.या बैठकीस माजी अध्यक्ष प्रमोद बिनवडे. प्रा.मनोज अवधूत, बाबासाहेब सासणे, शिवाजी केंगार ,ज्ञानेश्वर भगरे, मोहन माळी,केशव जाधव,दावल इनामदार, समाधान फुगारे,विजय भगरे यांचेसह विलास काळे,सूरेश केंगार,प्रविण गांडुळे, सुनिल कसबे ,दादा लवटे,अक्षय पवार,अविनाश मेटकरी,बापू मासाळ,राजकुमार मेतकुटे, बालाजी टुले आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर राजेंद्रकुमार जाधव यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.