मंगळवेढा /प्रतिनिधी :-
निर्भिड लेखणी,निपक्ष विचार, आणि सत्याचा अखंड ध्यास घेऊन पत्रकारितेचे व्रत निरंतर जोपासणारा पत्रकार हा पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ.बसवराज शिवपुजे यांनी केले.मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने आद्य मराठी पत्रकार,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या 195 व्या जयंतीच्या निमित्त पत्रकार भवन, दामाजी नगर मंगळवेढा येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे होते.व्यासपीठावार पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे,माजी अध्यक्ष अॅड. दत्तात्रय तोडकरी,संत दामाजी नगरचे सरपंच जमीर सुतार,संत दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक मारुती वाकडे, माजी उपसरपंच संजय जगताप,मनसेचे जिल्हा समन्वयक नारायण गोवे,ख.वि.संघाचे संचालक राजाभाऊ चेळेकर आदि उपस्थित होते.
डॉ.बसवराज शिवपुजे म्हणाले ,लोकशाहीमध्ये पहिला स्तंभ लोकनियुक्त पदाधिकारी असून दुसरा स्तंभ न्यायव्यवस्था व तिसरा स्तंभ प्रशासन अधिकारी तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभामध्ये पत्रकार असून लोकशाही बळकट व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत वरील तीन स्तंभांना सामान्य जनतेचा आवाज शासनाच्या व लोकनियुक्त पदाधिकार्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार हे अहोरात्र कष्ट करीत असतात. यासाठी संपादक,छायाचित्रकार, मुद्रितशोधक,वार्ताहर,वृत्तपत्र विक्रेते, श्रमिक पत्रकार तसेच पत्रकारितेचे प्रशासक बांधव हे सर्व पत्रकार क्षेत्रातील शिलेदार या चौथ्या स्तंभाचे भागीदार असून मराठीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचाराचा वारसा ते अहोरात्र जपत आहेत,हाच वृत्तपत्रकारितेचा वारसा मंगळवेढ्यातून गेल्या 26 वर्षापासून मंगळवेढा तालुका पत्रकार संघ त्याचे संस्थापक वेगवेगळ्या वृत्तपत्राचे संपादक कार्यकारी सदस्य हे अचूकपणे पुढे नेत आहेत. याबद्दल मला अभिमान वाटतो,तसेच आमच्या पोलीस विभागाच्या दररोज घडणार्या घटना सर्व वृत्तपत्रकार आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तसेच निरनिराळे पोर्टल व्हॉट्सऍप,ट्विटर,फेसबुक, यूट्यूब इत्यादी प्रसारमाध्यमातून लोकांच्या पर्यंत त्वरित पोहोचवत असल्याने पत्रकार हे पोलीस खात्याचा दुवा म्हणून काम करीत आहेत.
सदरप्रसंगी मारूती वाकडे,राजाभाऊ चेळेकर यांनीही आपल्या मनोगतातून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात दैनिक लोकमतचे प्रविण गांडुळे यांना स्व.अनंत तांबट स्मृतीशेष तर साप्ताहिक धनगर शक्तीचे संपादक बापू मासाळ यांना स्व.तानाजी चौगुले स्मृतीशेष आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रा.मनोज अवधूत,बाबासाहेब सासणे,शिवाजी केंगार,ज्ञानेश्वर भगरे,मोहन माळी,केशव जाधव,दावल इनामदार, प्रमोद बिनवडे, समाधान फुगारे,अॅड.महादेव धोत्रे,महेश पाटील,सचिन हेंबाडे,विजय भगरे,विलास काळे,सुरेश केंगार, महेश वठारे,सुनिल कसबे,दादा लवटे,अक्षय पवार,अविनाश मेटकरी, म्हाळाप्पा शिंदे, प्रसाद कसबे,अमीर आतार,दत्तात्रय कांबळे,प्रशांत माळी, दिगंबर गरंडे, राहुल मस्के , येताळा खरबडे,राजकुमार मेतकुटे,बालाजी टुले आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी अध्यक्ष भीमराव मोरे ,सूत्रसंचालन संतोष मिसाळ तर आभारप्रदर्शन राजेंद्रकुमार जाधव यांनी केले.