ढवळस येथील शिवरत्न तरुण मंडळाच्या वतीने नूतन अध्यक्ष सचिन हेंबाडे यांचा अभिनंदनपर सत्कार

ढवळस येथील शिवरत्न तरुण मंडळाच्या वतीने नूतन अध्यक्ष सचिन हेंबाडे यांचा अभिनंदनपर सत्कार 

मंगळवेढा/ प्रतिनिधी :- 

ढवळस येथे निर्भिड लेखणी,निपक्ष विचार, आणि सत्याचा अखंड ध्यास घेऊन पत्रकारितेचे व्रत निरंतर जोपासणारा पत्रकार हा पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.आद्य मराठी पत्रकार,दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या 195 व्या जयंतीच्या निमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधत शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी माणगंगा मेट्रो न्यूज संपादक सचिन हेंबाडे यांची निवड झाल्याबद्दल शिवरत्न तरुण मंडळाच्या वतीने अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
पत्रकारिता ही समाजाच्या चौथ्या स्तंभाप्रमाणे महत्त्वाची भूमिका बजावते.पत्रकार हे समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या निष्ठा, मेहनत आणि प्रामाणिकपणामुळेच समाजातील अनेक समस्या उजेडात येतात.पत्रकार समाजाचा डोळा असतो. तो चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी देतो. त्याचबरोबर वाईट गोष्टीही समाजासमोर मांडतो. मनोरंजनाबरोबरच दैनिकातून शिक्षण देण्याचे काम केले जाते. वर्तमानातील माहिती आणि भविष्याचे संकेत देण्याचे काम वर्तमानपत्रे करत आहेत. पत्रकार दिन साजरा करताना आपण त्यांच्या कार्याचा सन्मान केला पाहिजे आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प केला पाहिजे.

यावेळी विलास कुंभार, बापू सोलनकर,महेश जाधव,माजी उपसरपंच सतीश मोरे, सचिन कुंभार, तात्यासो मोरे,रामेश्वर पुजारी,शांतिप्रसाद जाधव,मोहन मोरे, औदुंबर कुंभार,प्रशांत आगलावे,पांडुरंग जाधव,औदुंबर मेटकरी,अभिषेक जाधव, आदर्श मोरे, संदीपान बावचे,शंतनु कुंभार, विठ्ठल बावचे,बिरुदेव सोलनकर, किशोर बावचे, बाबू बावचे आदीजण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.