बेगमपूर येथील फार्मर मॉल च्या वतीने पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
मंगळवेढा/ प्रतिनिधी :-
सार्वजनिक जीवनात परिवर्तनशील समाजव्यवस्थेसाठी सर्व पत्रकारांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन फार्मर मॉल या उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक जनार्धन शिवशरण यांनी व्यक्त केले आहे. पत्रकार दिनानिमित्त फार्मर मॉल बेगमपूर येथे पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पत्रकारितेतील सत्य, निर्भीडपणा आणि सामाजिक जबाबदारीची क्रांतिकारक परंपरा अखंडपणे तेजस्वी राहण्यासाठी सर्वच पत्रकार बांधवांनी आपली जबाबदारी सक्षमपणे पेलली आहे. यामुळेच देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक भक्कमपणे कार्यरत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. समाजातील वास्तव निर्भीडपणे मांडण्यासाठी आणि प्रश्न विचारण्याचे धैर्य उराशी बाळगत अन्यायाविरुद्ध आवाज उठवून सर्वसामान्यांचे दुःख मांडणे हीच खरी पत्रकारिता नि:स्वार्थपणे पत्रकारांनी जपली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष भीमराव मोरे म्हणाले की, पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. त्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. अशा कार्याची दखल घेऊन उद्योग स्तरावरून दिलेला हा सन्मान निश्चितच सर्व पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. या सन्मानाबद्दल व प्रेमळ आदरासाठी त्यांनी फार्मर मॉलचे उपस्थित सर्व पत्रकारांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन हेंबाडे, महेश पाटील, मोहोळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण भोसले, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सुनील कसबे, मल्लिकार्जुन देशमुखे, देविदास नाईकनवरे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, भीमराव मोरे, समाधान हेंबाडे, मोहन माळी, शिवाजी केंगार, प्रमोद बिनवडे, विजय भगरे, श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण गांडुळे, उपाध्यक्ष अक्षय पवार, पत्रकार महादेव धोत्रे, अशोक कांबळे, दिनेश सातपुते, प्रकाश गव्हाणे, शिवाजी जाधव, श्रावण तिर्भे, राजगोपाल खांडेकर, राहुल मस्के, सुशील वाघमारे, दिगंबर गरंडे, प्रसाद कसबे उपस्थिती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले, तर सर्वात शेवटी फार्मर मॉल उद्योगसमूहाच्या कार्यकारी संचालिका करुणा जनार्धन शिवशरण यांनी सर्वांच्या आभार मानले.