अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
नंदूर येथे बेकायदा वाळू वाहतूक करणारा टेम्पो महसूलच्या कर्मचाऱ्यांनी पकडून ४ लाख १० हजार रुपये किंमतीचा वाळू व टेम्पोसह मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द गून्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी कैलास शिंदे हे मंडळाधिकारी असून दि.७ जानेवारी रोजी रात्री ११.४५ वाजता नंदूर फाटा येथे महसूल पथक गस्त घालीत असताना एम.एच.१४ बी.जे.०२८५ हा टेम्पो दोन ब्रास वाळू वाहतूक करताना या पथकास मिळून आला.या दरम्यान चालकाकडे वाळू वाहतूकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगीतले.
यावेळी टेम्पो चालकाने पथकाची नजर चुकवून अधारात पळून गेला, त्याचा पथकाने पाठलाग केला असता तो मिळून आला नसल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.