मंगळवेढा / प्रतिनिधी :-
संत दामाजीनगर गणातून ब्रह्मपुरी गावच्या सौ. सविताताई मधुकर कोकरे यांनी कोणतीही निवडणुकी केवळ पदासाठी नसून जनतेच्या आणि त्या भागातील परिसरात च्या सर्वांगीण विकासासाठी असते. भाजपचा विचार हा विकास कामे करणारा विचार आहे.त्यांना सर्व गावातून उत्पूर्त प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे.
केंद्रात व राज्यात भाजप सरकारने विकासाची मजबूत कामे केली असून त्याचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी संत दामाजीनगर पंचायत समिती गणातून आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने सौ. सविताताई मधुकर कोकरे यांनी उमेदवारी अर्ज भरून कमळ या चिन्हावर निवडणुक लढविण्यासाठी तयार झाल्या आहेत.
सध्या ब्रह्मपुरी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करून जनतेची सेवा करीत असून त्यांनी आपल्या गावापासूनच समाजसेवेची सुरुवात करून आता संत दामाजीनगर पंचायत समिती गणातून निवडणुकीत भाजप कडून उमेदवारी अर्ज भरून सेवा करण्याची अंगी जिद्द बाळगली आहे.
सविता कोकरे यांनी आपल्या गावापासूनच समाजसेवेची सुरुवात करून महिला बचत गटाच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क वाढवला आहे. सामाजिक कार्याची आवड आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून निधीचा पाठपुरावा करून गावांमध्ये व दलित वस्तीमध्ये अनेक विकास कामांना निधी मिळवून आणला आहे. गावातील दलित वस्ती ब्लॉक बसवणे.रस्ते काँक्रिटीकरण करणे. आमदार समाधान आवताडे यांच्या फंडातून लिंगायत स्मशानभूमी काँक्रीट रस्त्यासाठी प्रयत्न करत आहेत. गावातील मारुती मंदिर सभा मंडपासाठी पाठपुरावा केला. श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरासाठी सभा मंडपासाठी पाठपुरावा करणार आहे. गावातील म्हाकूबाई मंदिराला सभा मंडपासाठी निधी मिळवण्यासाठी त्यांचा खारीचा वाटा असून त्यांचे पती मधुकर कोकरे यांनी देखील राजकारणामध्ये सक्रिय असतात. त्यांचे पती विकास सेवा सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी उत्तम व चांगल्या प्रकारे काम करत आपली भूमिका पार पाडत आहेत,अशा अनेक सामाजिक कार्याची आवड आहे.
सौ.सविता कोकरे यांनी संत दामाजी नगर गणातील सर्व गावांमध्ये भेटीगाठी देत नागरिकांच्या घरी जाऊन रस्ते,पाणीपुरवठा,वीज, आरोग्य, सेवा, शाळा,अंगणवाडी, शेती व रोजगार यासारख्या मूलभूत समस्या जाणून घेतल्या आहेत.
खरंतर सर्वसमावेशक संवादातून विश्वास निर्माण होतो आणि त्या विश्वासातूनच गावाच्या सर्वांगीण विकास साधता येतो,या भावनेतून संत दामाजीनगर गणातून सर्व गावाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.तसेच भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे आव्हान सौ.सविताताई मधुकर कोकरे यांनी केले.