ब्रम्हपुरी येथे ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण...

ब्रम्हपुरी येथे ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण...

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा बुधवारी सकाळी बारामती येथे भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीमध्ये आयोजित केलेल्या चार जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी ते मुंबईहून पहाटे विमानाने निघाले होते. मात्र, बारामती येथे सकाळी ८.४५ च्या सुमारास त्यांच्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यापूर्वीच भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला.याप्रसंगी मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील ग्रामस्थांनी एकत्र जमून अजित दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 यावेळी राजन भैया पाटील,मा.सरपंच विजयसिंह पाटील, सरपंच संजय चरणू काका पाटील, उदयसिंह पाटील, दिलीप पुजारी ,बाळकृष्ण मोरे,विकास पुजारी ,शेखर पाटील ,अमर पाटील, आनंद पाटील, रणजीत पाटील,पृथ्वी पाटील, शिवाजी कांबळे सर, उपसरपंच संदीप पाटील ,मनोज पाटील, विक्रम पाटील ,शामराव खाडे, दत्ता आसबे आदिजण ब्रह्मपुरी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.