लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद व चोखामेळा नगर पंचायत समिती गटात भाजपा उमेदवारांची ताकद दुप्पट वाढली...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
लक्ष्मी दहिवडी या पंचायत समिती गणातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार संगीता राजेंद्र लेंडवे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद उमेदवार करुणा जनार्धन शिवशरण व चोखामेळा नगर पंचायत समिती गणाच्या उमेदवार दिपाली आनंदराव ताड यांना जाहीर बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
आमच्या भगिनी संगीता लेंडवे यांचा हा पाठिंबा म्हणजे आमदार समाधान आवताडे यांच्या धोरणात्मक कार्यावर, सर्वसमावेशक विचारांवर आणि विकासाभिमुख भूमिकेवर दाखवलेला ठाम विश्वास आहे.
विविध सामाजिक घटक आणि संघटनांचा वाढता पाठिंबा हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची स्वीकारार्हता आणि विश्वासार्हता अधोरेखित करत असल्यामुळे या पाठिंब्याने आपल्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या विजयाचा मार्ग जवळ झाला आहे असा विश्वास नगरसेवक सोमनाथ आवताडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, सरपंच डॉ. संतोष लेंडवे, जेष्ठ मार्गदर्शक शिवाजी लेंडवे, उपसरपंच मारुती लेंडवे, उद्योगपती जनार्धन शिवशरण, माजी उपसरपंच दादासाहेब ताड, माजी उपसरपंच सुहास पवार, युवक नेते राजेंद्र लेंडवे, उद्योजक बाळासाहेब ताड, उद्योजक बिरूदेव कोळेकर, युवक नेते संतोष लेंडवे, उमेश ताड आदी सहकारी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.