वारी परिवारास आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार जाहीर...

वारी परिवारास आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार जाहीर...

मंगळवेढा/ प्रतिनिधी:- 

सिद्धापूर फेस्टिवलच्या वतीने आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार वारी परिवार मंगळवेढा या सामाजिक संस्थेस जाहीर करण्यात आलेला आहे. वारी परिवाराच्या वतीने अनेक लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

दारू नको दूध प्या, माणुसकीची भिंत,नेत्रदान महासंकल्प,नोकरी महोत्सव,विद्यार्थी दत्तक योजना, शैक्षणिक साहित्य वाटप, पर्यावरण रक्षण जनजागृती प्रबोधन सायकल रॅली,वृक्षलागवड व संवर्धन मोहीम, व्यसनमुक्ती अभियान, वीर जवान तुझे सलाम, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ,ज्वारी मका परिषद, डाळिंब उत्पादक शेतकरी कार्यशाळा, खुला गट खो-खो स्पर्धा, एड्स जनजागृती सप्ताह ,स्वच्छता मोहीम ,स्मशानभूमी गाय दान अशा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रीडा, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

सदर पुरस्काराचे वितरण दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता सिद्धापूर येथे होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.