मंगळवेढा/प्रतिनिधी :-
श्री संत दामाजी पंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगळवेढा येथे दि. 12 जानेवारी , 2026 रोजी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब , योगाचा आणि वेदांताचा जगभर प्रसार करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचे चार हुतात्मे मल्लाप्पा धनशेट्टी , श्रीकिसन सारडा , कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिदे यांच्या स्मृती दिना निमित्त श्री संत दामाजी महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. नवनाथ जगताप यांचे " राष्ट्रीय युवा दिवस " या विषयावर व्याख्यान संपन्न झाले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गटनिदेशक शिकलगार मॅडम यांनी भूषविले.
आपल्या भाषणा मधून डॉ. नवनाथ जगताप यांनी हक्काचा आग्रह धरताना कर्तव्याचा विसर पडू देऊ नका . चालताना पाय घसरला तरी चालेल पण बोलताना जीभ घसरू देऊ नका . नियमितपणा ही निश्चयाची , आत्मबलाची , व यशाची जननी आहे . मनुष्यत्व , देवत्व व पशुत्व यांचा सुरेख संगम म्ह णजेच मानवी जीवन आहे . उठा जागे व्हा आणि तो पर्यन्त थांबू नका जो पर्यंत लक्ष्य प्राप्त होत नाही . स्वतःला कमजोर समझने सर्वात मोठे पाप आहे . जो पर्यन्त जीवन आहे तो पर्यन्त शिक्षण आहे . आशा प्रकारच्या स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य - एस. बी. कांबळे , खमितकर मॅडम यांची प्रमुख उपस्थिति लाभली . सूत्रसंचालन प्रा. ताठे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. खामकर यांनी केले.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .