भाजपाच्या लक्ष्मीदहिवडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार करूणा शिवशरण यांची प्रचारात मोठी आघाडी ...
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहिवडी जिल्हा परिषद गटांमध्ये होम टू होम प्रचार करत भाजपाच्या उमेदवार करुणाताई जनार्धन शिवशरण या मतदारापर्यंत पोहचत असून त्यांना लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटांमध्ये मोठा मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे, गटातील मतदार, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर मोठा भर दिला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून झालेला मतदारसंघाचा विकास तसेच लक्ष्मीदहिवडी जिल्हा परिषद गटात आवताडे परिवाराला राजकीयदृष्ट्या असणारी ताकद आणि आमदार आवताडे यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत झालेली शाश्वत विकास कामे या सर्व बाबींना लक्षात घेऊन मतदारांचा भारतीय जनता पार्टीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. आमदार समाधान आवताडे यांनी कोणत्याही प्रकारे राजकारण न पाहता केवळ मतदार संघाचा केलेला सर्वांगीण विकास आणि त्यांचे विकासाचे व्हिजन या गोष्टींची उमेदवार करुणा शिवशरण या गावभेट दौऱ्यात मतदारांना समजावून सांगत आहेत. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी 24 गावे उपसा सिंचन ही महत्त्वाकांक्षी पाणी योजना प्रत्यक्षात सुरू झाल्याने या भागातील दुष्काळाचे सावट संपून लवकरच या भागातील शेतकरी आणि नागरिक सुजलाम-सुफलाम होणार आहेत.
उद्योजक जनार्धन शिवशरण यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एका दलित समाजातील होतकरू तरुण उद्योग व्यवसायामध्ये स्व-कर्तृत्वाने मोठी झेप घेऊ शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांच्या या प्रवासात उमेदवार करुणा शिवशरण यांनी केवळ एक गृह महिला म्हणूनच नव्हे तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून फार्मर मॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी ठेवलेली जवळीक त्यांना सार्वजनिक राजकारणाच्या या टप्प्यावर अतिशय महत्त्वाची ठरत आहे. यशस्वी उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून आज पर्यंत त्यांनी केलेल्या सामाजिक हिताच्या कार्याच्या जोरावर तसेच नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांना मोठे जनसमर्थन प्राप्त होत आहे. त्यांनी आपल्या होम टू होम गाव भेट दौऱ्यामध्ये नागरिकांच्या पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य शिक्षण या समस्या जाणून घेत आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून सर्व समस्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत सोडवण्याचा निर्धार मतदारांसमोर केला आहे.
उमेदवार करुणा शिवशरण यांनी प्रचारामध्ये घेतलेल्या आघाडीमुळे त्यांची प्रतिमा कार्यक्षम व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून जनतेमध्ये पसरत आहे. त्यांच्या या गाव भेट दौऱ्यात त्यांना विविध स्तरातून पाठीमा मिळत असून युवक महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्येही त्यांच्याबाबत मोठी सकारात्मकता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा जिल्हा परिषद लक्ष्मी दहिवडी गटात विजय निश्चित मानला जात आहे.
जिल्हा परिषद लक्ष्मी दहिवडी गटातील उमेदवारांचा विजय निश्चित- आमदार समाधान आवताडे
राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मंगळवेढा तालुक्यातील गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारे 24 गावे उपसा सिंचन योजना तसेच इतर विविध लोककल्याणकारी योजना मार्गी लागल्यामुळे मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टी विषयी मोठी विश्वासाहर्ता आणि निर्भेळ प्रेम निर्माण झाले आहे. गटातील उमेदवारांची लोकसेवेची तळमळ आणि विकासाचा दूरदृष्टीकोन लक्षात घेता जिल्हा परिषद गटाचे उमेदवार करुणा जनार्धन शिवशरण व लक्ष्मी दहिवडी पंचायत समिती गटाचे उमेदवार विनायकराव माधवराव यादव तसेच चोखामेळा नगर पंचायत समिती गटाच्या उमेदवार दिपाली आनंदराव ताड हे सर्वजण जनतेच्या आशीर्वाद रुपी मतांच्या मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.