जनतेची सेवा व विकासाचे ध्येय साध्य करून ग्रामीण भागात निवडणूक रिंगणात - रमेश भांजे;भाजपचे उमेदवार अरळीचे रमेश भांजे यांचे संत दामाजीनगर गटात उत्पूर्त प्रतिसाद ...

जनतेची सेवा व विकासाचे ध्येय साध्य करून ग्रामीण भागात निवडणूक रिंगणात - रमेश भांजे 

भाजपचे उमेदवार अरळीचे रमेश भांजे यांचे संत दामाजीनगर गटात उत्पूर्त प्रतिसाद ...

मंगळवेढा/प्रतिनिधी :-

भारतीय जनता पार्टी कडून संत दामाजी नगर जिल्हा परिषद गटातून अधिकृत उमेदवार म्हणून अरळी गावचे रमेश श्रीमंत भांजे यांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक ही पदासाठी नसून जनतेच्या व त्या भागातील परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी असते. भाजपचा विचार हा विकास कामे करणारा विचार आहे. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने विकासाची मजबूत पायाभरणी केली असून, त्याचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषद संत दामाजी नगर गटातून आपण निवडणूकीच्या रिंगणात असल्याचे या गटाचे उमेदवार रमेश श्रीमंत भांजे यांनी व्यक्त केले आहे.

त्यांनी सन १९९९ ते २००२ साली अरळी विकास सेवा सोसायटीचे संचालक, सन २००० ते २००५ साली अरळी ग्रामपंचायत उपसरपंच,सन २००५ ते २००८ साली अरळी ग्रामपंचायत सरपंच,सन २००७ ते २०१२ साली मंगळवेढा पंचायत समिती उपसभापती,सन २०१० ते २०१५ साली श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखाना संचालक,सन २०१७ ते २०२२ साली मंगळवेढा पंचायत समिती सदस्य,म्हणून काम पाहिले आहे.सध्या मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित माध्यमिक शाळा, अरळी सचिव म्हणून काम पाहत आहेत.

संत दामाजीनगर जिल्हा परिषद गटातील अरळी, बोराळे ,सिद्धापूर , डोणज, नंदुर, मुंढेवाडी, तांडोर, रहाटेवाडी या गावांत अनेक विकास कामे करून जनतेची सेवा केली आहे.त्यामध्ये हायमास्ट दिवे बसविणे,कॉंक्रिटीकरण रस्ते करणे,आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणे,बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी कामे केली आहेत.


रमेश भांजे यांनी संत दामाजी नगर गटातील सर्व गावांमध्ये गाठी-भेटी घेऊन नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधत असताना रस्ते,वीज,आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, शाळा, रोजगार, अंगणवाडी,शेती यासारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या.

उमेदवार रमेश भांजे यांनी बोलताना सांगितले की, आमदार समाधान आवताडे यांचे अनुभवी नेतृत्व, भाजप कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि संत दामाजी नगर गटातील जनतेशी माझा संपर्क असणारा थेट संवाद हीच माझ्या उमेदवारीची खरी ताकद आहे. नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळत असल्याने विकासाच्या लढाईत आम्ही निश्चितपणे यशस्वी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गाव भेट दरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.