भाजप व मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे यांचा पाठिंब्याच्या रूपाने आशीर्वाद...
संत दामाजीनगर गटातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व उमेदवारांचे पारडे जड...
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिल्हा परिषद दामाजी नगर व पंचायत समिती गणातील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन सहकाररत्न आदरणीय श्री. बबनराव जी आवताडे साहेब यांनी पाठिंब्याच्या रूपाने आशीर्वाद प्रदान केले.
आवताडे परिवाराशी सार्वजनिक जीवनातील नाते जोडणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची राजकीय दृढता अधिक घट्ट आणि विश्वासपूरक होण्यासाठी अशा शक्ती कोणत्याही राजकीय नेतृत्व निर्मितीसाठी चैतन्य ऊर्जा आहेत.
लोकांचा हा विश्वास, ही आपुलकी आणि जबाबदारी यांच्याशी सुसंगत करण्याचा एक वैचारिक खरा आधार या आशीर्वादातून अधोरेखित झाला आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव उभे राहणे आणि शक्य तितक्या लवकर दिलासा देणे, हाच प्रामाणिक प्रयत्न राहील या रूपाने आणखी गतीशील आणि क्रियाशील होण्याच्या मार्गांवर आहे.
याप्रसंगी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री.सिद्धेश्वर जी आवताडे, माजी संचालक श्री.राजन भैय्या पाटील, उमेदवार श्री. रमेश भांजे सावकार, शेतकरी संघटनेचे नेते सिद्धेश्वर हेंबाडे ,मधुकर बेदरे ,संत दामाजी नगर सरपंच जमीर सुतार ,उपसरपंच संजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गायकवाड, बसवेश्वर माळी, ज्ञानेश्वर वाघमारे, अण्णासाहेब आसबे, दासू काका शिंदे, अरुण गोसडे,बठाण माजी सरपंच बिबीशन बेदरे, दत्तात्रय बेदरे, संजय बाबर, नवनाथ हेंबाडे,नामदेव हेंबाडे, व तसेच या गटातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नागरिक आणि मतदार उपस्थित होते.