तीन डांबा वरील एकनिष्ठ कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी ; या मागणीची सर्व स्तरातून चर्चा...


तीन डांबा वरील एकनिष्ठ कार्यकर्त्याला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी ; या मागणीची सर्व स्तरातून चर्चा

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

मंगळवेढा नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर सत्ता समीकरण स्पष्ट झाले आहे. यामध्ये शनिवार पेठ भागातील सर्जेराव आवताडे यांच्या नावाची चर्चा खूप जोर धरू लागली आहे.

 आज पर्यंत पक्षश्रेष्ठीं च्या शब्दाचे पालन करून तीन वेळा नगरसेवक पदासाठी माघार घेतली. पक्ष व पक्षश्रेष्ठी सांगतील तेच कर्तव्य असे म्हणून पक्षश्रेष्ठींच्या शब्दासाठी सर्वच बाजूने सक्षम असून देखील नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून सलग तीन वेळा माघार घेऊन आपल्यावरची पक्षश्रेष्ठी बद्दल असलेली निष्ठा आपुलकी व प्रेम यांनी दाखवले. 

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना या संस्थेच्या निवडणुकीमध्ये आवताडे गटाचा विजयी गुलाल उधळण्यासाठी यांचा मुलगा युवा नेता विनायक उर्फ केशव आवताडे यांनी खूप पराकाष्टा करून मोलाचा वाटा उचलला व विजय सर्वांच्या सहकार्याने ओढून आणला. मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शनिवार पेठ भागातील नगरसेवक निवडून आणण्यामागे या आवताडे कुटुंबीयांचे फार मोठे योगदान आहे.

 जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये गतवर्षी आवताडे गटाचा अटकेपार झेंडा फडकला. हा झेंडा फडकवताना सूक्ष्म नियोजन,चाणाक्ष पद्धतीने केलेला प्रचार व प्रसार यामध्ये केशव आवताडे हे किती अग्रेसर होते ही संपूर्ण मंगळवेढा तालुक्याने पाहिले.तल्लख बुद्धिमत्ता ग्रामीण मधील युवकांची पकड व त्या युवकांना योग्यरित्या दिशा देऊन विजयाची सांगड कशी घालायची हे दाखवून दिले.

मंगळवेढा शहराबरोबर यांना मंगळवेढा तालुक्यातील बहुतांश लोक आवताडे गटाचे खंदे समर्थक व स्टार प्रचारक म्हणून ओळखतात.आपला असो वा विरोधक सर्वांनाच एकसंघ धरून काम करणारा व शहराच्या व तालुक्याच्या विकासाचे ध्येय बाळगणारा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

याच सर्व बाबींमुळे मंगळवेढा शहरातून स्वीकृत नगरसेवक पदाची माळ त्या घराच्या गळ्यात घालून आज पर्यंत केलेल्या त्यांच्या त्यागाला व पक्षश्रेष्ठी बद्दलच्या असलेल्या प्रेमाला योग्य न्याय द्यावा ही मागणी मंगळवेढा शहरातून जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.