मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम उद्याच भरणार उमेदवारी अर्ज

मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम उद्याच भरणार उमेदवारी अर्ज

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

मंगळवेढा नगरपालिकेचा कारभार पुन्हा सर्वसाधारण महिलेच्या हाती जाणार असल्यामुळे अनेक महिला मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत.

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कडून पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे व भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी झेंडा फडवण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली आहे. अशा परिस्थितीत त्यामधील काहींनी आघाडी करून निवडणूक लढवण्याबद्दलचा सुर व्यक्त केला. मात्र भाजप पक्षाने लोकसभेला व विधानसभेला कमळ चालते मग नगरपालिकेला का नको ही भूमिका ठेवून नगरपालिका कमळ चिन्हावर लढवण्याबद्दल पुढाकार घेतला. भाजपकडून प्रा.तेजस्विनी कदम, प्रा.सुप्रिया जगताप, राधा सुरवसे या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या गेल्या.
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता जोरदार रणधुमाळी सुरू झाली असून भारतीय जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम ह्या उद्या सोमवारी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील असा सुज्ञ मतदारांकडून विश्वास व्यक्त केला जात आहे. 

यामध्ये मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांची संख्या वाढली आहे. भाजपकडून साहजिकच प्रा.तेजस्विनी कदम यांची उमेदवारी निश्चित होऊन त्या उद्याच सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील असे आज दिवसभर मंगळवेढा शहरातून चर्चा रंगत होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.