मंगळवेढा तहसील कार्यालयाकडून "सेवा पंधरवडा" आजपासून सुरु...
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ आक्टोंबर) या कालावधीत "सेवा पंधरवडा" राबविण्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा तालुक्यातील दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा तीन टप्यामध्ये राबविणेत येणार आहे.
पहिला टप्पा- पाणंद रस्ते विषयक मोहिम, दुसरा टप्पा - सर्वांसाठी घरे व तिसरा टप्पा - नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे़.
पहिला टप्पा- पाणंद रस्ते विषयक मोहिम अंतर्गत दि.१०/०९/२०२५ ते १३/०९/२०२५ या कालावधीमध्ये मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी ग्रामसेवक, महसूल सेवक, पोलीस पाटील यांचे समवेत मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावामध्ये शिवार फेरी कार्यक्रम राबवून नकाशावर नोंद असलेले एकूण रस्ते ४२४ व नकाशावर नोंद नसलेले एकूण रस्ते १५९ रस्त्यांचे सर्वेक्षण करून माहिती संकलीत करण्यात आली. सदर सर्वेक्षण करण्यात आलेल्या याद्यांचे वाचन आज दि.१७/०९/२०२५ रोजी मंगळवेढा तालुक्यातील ८१ गावी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात आले. व सदर रस्त्यांचे याद्यास ग्रामसभेची मंजूरी घेण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज ग्रामसभेमध्ये ७/१२ चे चावडीवाचन करण्यात आले असून चावडीवाचनामध्ये मयत झालेले खातेदार यांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे ,अशी माहिती तहसिलदार मदन जाधव यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर सेवा पंधरवडा कायक्रम शासनाने आयोजित केलेल्या मोहिमे अंतर्गत दिनांक - १७ सप्टेंबर २०२५ रोजी वरील प्रमाणे नियोजन व आयोजन केलेले होते. या बाबत सर्व नागरिकांनी या आयोजनामध्ये सहभाग नोंदवून प्रशासनास सहाकार्य केले,असे मंगळवेढा तहसिलदार मदन जाधव यांनी सांगीतले.