आठ दिवसात रोजगार हमी योजनेतील विहिरी सुरू करा.
मंगळवेढा/प्रतिनिधी :-
तीन-तीन गट विकास अधिकारी बदलून गेले मात्र आम्ही विहीर मंजूर असूनही कार्यारंभ आदेशासाठी हेलपाटे मारत आहोत तरी यंदा तरी आम्हाला विहिरीचा लाभ मिळेल का अशी याचना अनेक शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर मांडले असता येत्या आठ दिवसात रोजगार हमी योजनेच्या विहिरींचा प्रश्न निकाली काढा अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यासाठी मला भाग पाडू नका अनेक घरकुलांचे मस्टर व्यवस्थित काढले जात नाहीत घरकुल हे बेघरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे त्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व प्रशासनाने नियमाचा खोडा न घालता बेघराला निवारा देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या ते मंगळवेढा येथील जोगेश्वरी मंगल कार्यालय येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुजबळ पंचायत समिती गटविकास अधिकारी जस्मिन शेख, तहसीलदार मदन जाधव, माजी सभापती प्रदीप खांडेकर,औदुंबर वाडदेकर, सरपंच विनायक यादव, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे,
तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, प्रहार चे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे , रामेश्वर मासाळ,प्रकाश गायकवाड, नितीन पाटील, काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे यांचेसह मान्यवर आणि प्रशासकीय अधिकारी व पदाधिकारी तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक उपस्थित होते.
आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती अंतर्गत घरकुल, विहिरी व जलजीवन योजनेचा आढावा सरपंच पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत घेतला यावेळी अनेक गावचा पदाधिकाऱ्यांनी विविध खात्याच्या तक्रारी करत अधिकाऱ्यांनी विरोधात आपला रोज व्यक्त केला. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी पाच लाख रुपये शासन अनुदान देते मात्र त्याला अनेक नियम अटी असल्यामुळे त्या नियम अटीची पूर्तता करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे त्यातील काही नियम अटी रद्द कराव्यात अशी मागणी काही शेतकऱ्यांनी आमदार समाधान आवताडे यांचे कडे केली त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींना मंजुरी दिली आहे मात्र तीन-तीन वर्षापासून त्या विहिरी सुरू करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला नाही अनेक शेतकऱ्यांनी विहीर मंजूर झाल्यानंतर विहिरी खोदल्या आहेत त्या विहिरींची बिलेही प्रशासनाने दिलेली नाहीत नियमांचा खोडा घालून अनेकांची बिले रखडवली आहेत अशा अनेक तक्रारी लाभार्थ्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर मांडल्या.
यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की पंचायत समितीकडे असलेले प्रस्ताव त्याचबरोबर ग्रामपंचायतकडे परत पाठवलेले प्रस्ताव या सर्व प्रस्तावांची आठ दिवसात पडताळणी करून सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी व मंजूर असलेल्या विहिरींचे कार्यारंभ आदेश तात्काळ देण्यात यावेत आठ दिवसांमध्ये विहिरींच्या बाबतीतल्या तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या त्याच बरोबर घरकुल संदर्भात ही गाव पातळीवर जागेच्या अडचणी सोडवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळवून द्यावा जलजीवन योजनेमध्ये अनेक ठिकाणी निकृष्ट कामे झाली असल्याचा तक्रारी पदाधिकारी व ग्रामस्थांनी केले आहेत ज्या ठिकाणी निकृष्ट कामे झाली आहेत त्या ठिकाणी चौकशी करून सदर ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका अशा सूचना आमदार अवताडे यांनी दिल्या.यावेळी आवताडे यांनी सामान्य जनतेशी सहकार्याची भूमिका ठेवून काम करा जनतेच्या हितासाठी नियमाचा खोडा न घालता नियमात बसवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ द्या अशा सूचना देत आढावा बैठकीची सांगता केली.