सदगुरु बैठकीसाठी जाणाऱ्या महिलांच्या स्कुटीला माल ट्रकने चिरडले; मंगळवेढ्यातील तासगावकर कुटुंबातील सासू व सून दोघी ही जागीच ठार

सदगुरु बैठकीसाठी जाणाऱ्या महिलांच्या स्कुटीला माल ट्रकने चिरडले; मंगळवेढ्यातील तासगावकर कुटुंबातील सासू व सून दोघी ही जागीच ठार

मंगळवेढा/प्रतिनिधी:- 

मंगळवेढ्यात एका माल ट्रकने स्कुटीवर जाणाऱ्या दोन महिलांना चिरडले असल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 7.40 च्या दरम्यान मंगळवेढा-सोलापूर दामाजी कारखाना बायपास रोड येथे घडली आहे.ही घटना इतकी भीषण होती की तासगावकर कुटुंबातील दोन महिला जागीच पडून ट्रक अंगावर जाऊन चेंदामेंदा झाल्या होत्या.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज रविवार असल्याने महिलांच्या सदगुरु बैठकीचे आयोजन केले जाते. त्या बैठकीसाठी तासगावकर कुटुंबातील सून व सासू दोघी बैठकीला जाणार होत्या.दोघीजणी स्कुटी वरती जात असताना दामाजी कारखाना बायपास रोड येथे पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालट्रकने जोराची धडक मारली.

मालट्रकने जोराची धडक दिल्याने मालट्रक दोघींच्या अंगावरती जाऊन त्या दोघीजणी जागेवरच ठार झाल्या आहेत.मालट्रकने स्कुटी गाडीला धडक दिली आणि यात स्कुटी ट्रकच्याखाली गेल्याने दोघीही चेंगरल्या गेल्या. यात सून आणि सासू यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच घरातील दोघींचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने मंगळवेढा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.