मंगळवेढा पोलिसांनी दोन्ही आरोपींना घेतले ताब्यात
मंगळवेढा /प्रतिनिधी :-
पाटखळ येथील सावत वस्तीवर कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत पत्नी जळून मृत्यू झाली आहे, असे पती नागेश सावंत व सासरच्या मंडळींकडून सांगितले जात होते. मात्र, नागेश याची पत्नी किरण ही कराड येथें पोलिसांना आढळून आली आहे तर कडब्याच्या गंजीत जळून किरण नाही तर अन्य दुसरीच महिला मेली आहे. या चक्रावून टाकणाऱ्या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
पाटखळ येथे किरण या विवाहित मुलीचा झालेल्या मृत्यूची खबर देणाऱ्या मुलीच्या वडिलासह सर्वाना चक्रावून टाकणारी घटना घडली आहे़ ती विवाहित महिला कराडजवळ ताब्यात घेतली असून पाटखळमधील संशयित व्यक्तीदेखील पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. यात ती जळून मेली असे 'प्रथमदर्शनी चित्र समोर आले. मात्र,त्या महिलेचा गळा दाबून तिला ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे.मात्र, ती महिला कोण, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मंगळवेढा पोलिसांनी विवाहिता किरण नागेश सावंत (वय 22) हिचा अकस्मात मृत्यूझाल्याची सोमवारी सकाळी नोंद घेतली, परंतु सायंकाळी ती कराड येथे जिवंत असल्याचे तपासात समोर आल्याने घटनेला धक्कादायक वळण लागले आहे.आगीत मृत्यू कोणाचा झाला, यासंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की, खबर देणारे दशरथ दांडगे यांची मुलगी किरण (वय २२) हिचे फेब्रुवारी 2022 मध्ये पाटखळ येथील नागेश दिगंबर सावत यांच्या सोबत विवाह झाला.त्यांना आरोही (वय २) ही मुलगी आहे.
लग्नापासून मुलगी किरण व नागेश सावत आणि तिच्या सासरी (सावत वस्ती, पाटखळ, ता.मंगळवेढा) पती नागेश सावत, सासू संगीता सावत, सासरे दिगंबर सावत, तसेच चुलत सासरे दत्तात्रय सावत यांच्यासह राहण्यास आहे. दि. 14 जुलै रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास फिर्यदीची मुलगी किरण हिचे चुलत सासरे दत्तात्रय सावत यांचा फिर्यादीला फोन आला. त्यांनी, तुमची मुलगी किरण हिने पेटवून घेतले आहे, तुम्ही या असे कळविले. त्यावर लागलीच पहाटे 4.15 वा.चे सुमारास मुलगी किरण हिच्या सासरच्या घरी पाटखळ येथे माहेरची मंडळी आली.
तेथे लोकांची गर्दी जमा झाली होती. जावई नागेश सावंत यांनी किरणने पेटवून घेतले असे म्हणून सासऱ्याच्या गळ्यात पडून रडू लागला. घराच्या समोर पूर्वेला काही अंतरावर कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीमुळे गंज पूर्ण जळून खाक झाली होती, धूर निघत होता. त्या जळालेल्या गंजीमध्ये पश्चिमेकडील बाजूस एका महिलेचा मृतदेह भाजलेल्या अवस्थेत मयत स्थितीत आम्हाला दिसला. सदरचा मृतदेह ओळखण्यापलिकडे होता, सदरची 'मयत ही माझी मुलगी किरण सावत असल्याचे जावई नागेश सावत याने सांगितले. असे खबर देणाऱ्या दांडगे यांनी सांगितले. किरण सावत हिस कोणी व का मारले, याची चौकशी करुन दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली. असे असली तरी ती जिवंत असून मग ती मयत महिला कोण? याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.या महिलेच्या मृतदेहाचे अवशेष शवविच्छेदनासाठी व राख सोलापूर येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहे.
मृताची ओळख पटवणे आव्हान
मयत असलेला बनाव झालेली महिला ही दुपारी कराड येथे असल्याचे मंगळवेढा पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांचे पथक कराड येथे पोहोचले.रात्री उशिरा किरण सावत या महिलेला पोलिस मंगळवेढ्यात घेऊन आले. मात्र गंजीमध्ये पेटवून मयत झालेली महिला कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डीएनए तपासानंतर व फॉरेन्सिक अहवालनुसार त्या महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे, असे समजते तर दरम्यान ताब्यात असलेल्या ती व्यक्ती निशांत सावत व किरण सावंत हिच्याकडे सखोल चौकशी केली जाऊ शकते.