आ. सुभाष बापू देशमुख यांनी सामाजिक वसा जपला- दत्तात्रय जमदाडे
मंगळवेढा /प्रतिनिधी : -
लोकमंगल समुहाच्या माध्यमातुन संस्थापक व आ. सुभाषवापू देशमुख यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा लोकमंगल पतसंस्थेचे व्हा. चेअरमन दत्तात्रय जमदाडे यांनी केले. लोकमंगल बँकेच्या मंगळवेढा शाखेच्या वतीने इयत्ता दहावी ,बारावी व विविध स्पर्धा परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्यांचा गौरव दत्तात्रय जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना जमदाडे सर म्हणाले की, माजी सहकारमंत्री व आमदार मा. सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकमंगल समुहाने महाराष्ट्रभर सहकाराचे जाळे विणले आहे. लोकमंगल संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निमिर्ती झाली असून नवीन व्यवसायिक व उद्योजक निर्माण झाले आहेत . आ सुभाषबापू यांच्या कुशल नेतृत्वात लोकमंगल परिवाराने आर्थिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही चौफेर कामगिरी केलेली असून सोलापूर जिल्हयाच्या विकासात लोकमंगल समुहाचे योगदान मोठे आहे. याप्रसंगी त्यांनी लोकमंगल बँकेच्या प्रगतीचा व सामाजिक कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणू न विश्वनाथ ढेपे होते. यावेळी बोलताना ढेपे सरांनी अनेक उदाहरणांसहीत विद्यार्थ्याच्या व पालकांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मौलिक मार्गदर्शन केले . यावेळी दै लोकमतचे उपसंपादक समीर इनामदार, शिक्षक नेते संजय चेळेकर, शुभम बर्गे , राधिका घोडके , ऋषीकेश क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अस्लेशा भोसले, वेदांत खराडे ,आयुशी भुसे, शुभंम बर्गे, प्रणिती माने, श्रावणी पाटील, निकीता आवताडे ,प्रणवी पाटील, मिजवा शेख ,प्रतिक्षा चव्हाण, श्रेया माळी ,राधिका घोडके, रेहान इनामदार ,प्रणिती माने ,प्रणाली कोंडुभैरी, वैष्णवी मोरे, भक्ती विराजदार, किर्ती गवळी ,अजिंक्य मोरे ,माधवी विले ,प्रतिाक्षा विराजदार, प्रियांशु माने, मकरंद ढेपे, अॅड ऋषीकेश क्षिरसागर आदींचा गौरव करण्यात आला.
बँकेचे अधिकारी शिवाजी दरेकर यांनी प्रास्ताविक व सर्वांचे स्वागत करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यकमाचे सुत्रसंचलन राजेंद जाधव यांनी केले. उमेश काळे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यकमास शाखेचे शाखाधिकारी सचिन पलंगे कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष वावचे ,रमेश दत्तु ,सुनीता शिंदे, सुहास शिंदे, विशाल शिंदे ,धनश्री कोंडुभैरी ,राहुल जगताप व सोमनाथ गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले.