आवताडे स्पिनींग प्रा.लि. आरोग्य तपासणी शिबिर तसेच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी तसेच पाणपोई उदघाट्न संपन्न
मंगळवेढा (प्रतिनिधी)-
सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन माजी जेष्ठ संचालक कै महादेव बाबुराव आवताडे १९व्या पुण्यस्मरणानिमित्त आवताडे स्पिनर्स प्रा.लि.मंगळवेढा येथे आयोजित आरोग्य तपासणी व आयष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबीर तसेच पाणपोई शुभारंभ या कार्यक्रमांचे उदघाट्न उद्योगपती उद्योगरत्न संजय जी आवताडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा युवक नेते सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पर्चेस इन्चार्ज दिगंबर यादव यांनी सांगितले की, कै महादेव बाबुराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आवताडे स्पिनिंग मिल येथे अनेक समाजपयोगी सामाजिक उपक्रम राबवून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येते. सुदृढ आणि निरोगी आरोग्य ही काळाची गरज ओळखून यावर्षी या शिबिराचे आयोजन करण्याची संकल्पना सर्वांसमोर आली असता हा सुंदर उपक्रम यानिमित्ताने पार पडत आहे.
अशा सार्वजनिक उपक्रमांची व्याप्ती विस्तारित होण्याच्या अनुषंगाने अखिल भाविक वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीमती पार्वती महादेव आवताडे यांनी या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित राहून स्वतःची आरोग्य तपासणी करुन सर्वांना तपासणी करून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
अधिकारी-पदाधिकारी तसेच कामगार यांच्या आरोग्यदायी जीवनासाठी हा उपक्रम निश्चितच लाभदायक ठरेल, तसेच यामुळे आपलं आरोग्य जपले जाणार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन उद्योगपती संजय आवताडे यांनी यावेळी केले.
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सुरु केलेल्या या पाणपोईच्या माध्यमातून हजारो नागरिकांची तहान भागणार आहे हे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची तहान भागविण्याचे पुण्य आवताडे स्पिनर्स प्रा.लि.यांना मिळणार असल्याची भावना माजी सभापती सोमनाथ आवताडे यांनी यावेळी मांडली.
सदर कार्यक्रमासाठी जेष्ठ उद्योजक सरोज काझी, युनिट हेड सुनिल कमते, चीफ अकाउंटंट दत्तात्रय भोसले, विशाल सावंत तसेच इतर मिल, अधिकारी-पदाधिकारी, कर्मचारी वृंद आणि आरोग्य विभागातील मंडळी उपस्थित होते.