आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी २ कोटी ४४ लाख निधी मंजूर

आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी २ कोटी ४४ लाख निधी मंजूर

मंगळवेढा/प्रतिनिधी :- 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा यांच्यावतीने देण्यात आली आहे. सदर निधी प्राप्त होण्यासाठी आमदार अवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, ना.अजितदादा पवार, आरोग्यमंत्री ना.प्रकाश आबिटकर तसेच पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्याकडे माध्यमातून संबंधित आरोग्य विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून आणला आहे.

या मंजूर निधीतून तालुक्यातील येड्राव, सोड्डी, सलगर बु, कचरेवाडी या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील बांधकामासाठी प्रत्येकी ६१ लाख १९ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याने त्या त्या भागातील आरोग्य यंत्रणा गतिमान होत असल्याने याचा मोठा फायदा रुग्णसेवेसाठी होणार आहे. पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून धुरा खांद्यावर आल्यापासून आ समाधान आवताडे यांनी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या विकासाला मोठी चालना देत आरोग्य क्षेत्रात चांगली क्रांती घडवून आणली आहे.

यापूर्वी समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून मंगळवेढा येथील प्राथमिक आरोग्य ग्रामीण रुग्णालय केंद्रात १०० बेडचे सुसज्ज आणि अत्याधुनिक साधन-सामुग्री पद्धतीने संपन्न असे हॉस्पिटल उभा राहण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच ग्रामीण भागातील उपकेंद्रांसाठी मंजूर झालेल्या या निधीमुळे संपूर्ण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मोठ्या परिवर्तन चित्रात रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.