मंगळवेढा /प्रतिनिधी :-
विधानसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना आत्तापर्यंत होलार समाजाची भूमिका अस्पष्ट असल्याने चुरशीने होऊ घातलेल्या निवडणुकीत आज शुक्रवारी दुपारी एक वाजता समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन विधानसभेच्या निवडणुकीत निर्णय भूमिका घेणार असल्याची माहिती होलार समाजाचे नेते किसनराव भजनावळे यांनी प्रसिद्धेशी बोलताना सांगितले.
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात होलार समाजाची संख्या जास्त असून प्रत्येक निवडणुकीमध्ये एकोप्याने व समाजाचे हित पाहून राजकारण, समाजकारण करीत असलेले अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी स्पर्धात्मक होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज पर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र अगदी चुरशीने होऊ घातलेल्या निवडणुकीत हजारोच्या संख्येने मतदार असलेल्या समाजाची मते या निवडणुकीसाठी निर्णायक असणार असल्याचे नेते भजनावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंगळवेढा तालुक्यामध्ये चाळीस गावात होलार समाज बहुसंख्येने असून नक्कीच मंगळवेढा दक्षिण भागातील 40 ते 45 गावात होलार समाजाची मते विजयी उमेदवारासाठी लाख मोलाची ठरणार असल्याचे शेवटी भजनावळे यांनी बोलताना सांगितले.