आ समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये रड्डे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सह ६ ग्रा.पं.सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

आ समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये रड्डे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सह ६ ग्रा.पं.सदस्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश 


मंगळवेढा / प्रतिनिधी :-

रड्डे येथील लोकनियुक्त सरपंच सरस्वती शामराव थोरबोले यांनी ६ विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसमवेत भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

सर्वसमावेशक राजकारण आणि सलोख्याचे समाजकारण अशी कार्यनैतिकता असणाऱ्या आपल्या आ आवताडे यांना आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये रड्डे गावातून मोठी ताकद निर्माण करून पुनःश्च आमदारकीची माळ गळ्यात असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष सुनिल थोरबोले यांनी व्यक्त केला आहे.

सदर प्रवेशाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे, अश्विनी जयजयराम माने, संगीता प्रभाकर खांडेकर, उमेश रंभाजी सपताळे, नानासो हरिबा कोळेकर, चंदू कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी युवक नेते आकाश डांगे, शामराव थोरबोले, प्रभाकर खांडेकर, शशांक शामराव, थोरबोले विठ्ठल सपताळे, अभिमान माने, आकाश क्षिरसागर, संग्राम कांबळे, भीमराव थोरबोले सारंग गडहिरे, सिद्धेश्वर काळे, लहू नवत्रे, विठ्ठल सपताळे, निवृत्ती सरगर, अक्षय सपताळे, प्रशांत कांबळे आदी मान्यवर तसेच इतर युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.