मंगळवेढा/ सचिन हेंबाडे :-
भारत देशाला हिंदू राष्ट्र करायचे असेल तर प्रत्येक हिंदू माणसाने सक्षम झाले पाहिजे . प्रत्येक क्षेत्रामध्ये हिंदूंनी उतरून काम केले पाहिजे , असे प्रतिपादन सुदर्शन न्युज चॅनलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी मंगळवेढा येथे केले .
मंगळवेढा शहरामधील छत्रपती सभागृह येथे सुदर्शन न्युज चैनल चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी सदिच्छा भेट दिली , त्यासोबतच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद बैठक देखील साधली .संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सुरेश चव्हाणके यांचे विविध कार्यक्रम सुरू असून सभा , बैठका यांच्या माध्यमातून हिंदुत्व जागरणाचे कार्यक्रम सुरू आहेत . याच अनुषंगाने मंगळवेढा शहरांमध्ये देखील त्यांची बैठक संपन्न झाली . यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले , " प्रत्येक हिंदू संघटित झाला पाहिजे . जातीपातीच्या पुढे जाऊन हिंदू म्हणून विचार करणारा कार्यकर्ता घडला पाहिजे . आज जगाला तारणारा हिंदू धर्म असून प्रत्येकाचा विचार करणारा हा आपलाच धर्म आहे . आपल्या धर्मावरती संकटे येत असतील तर आपण तेवढेच सक्षमतेने उभा राहिले पाहिजे . कोणतीही जात पात मनामध्ये न आणता फक्त हिंदू म्हणून विचार करणे गरजेचे आहे . प्रत्येक क्षेत्रांमध्ये हिंदू हा संघटित झाला पाहिजे . प्रत्येक ठिकाणी हिंदू उभारला पाहिजे , याकरता प्रयत्न होणे गरजेचे आहे . आज देशभरामध्ये वोट जिहाद पाहायला मिळत आहे हे बघून फक्त शांत न बसता हिंदू देखील एक झाला पाहिजे . फक्त निवडणुका पुरते हे असून चालणार नाही तर हिंदुत्व टिकवण्याकरता हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे ." असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .
या बैठकीस महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे प्रमुख अभिजीत पाटील ,शशिकांत चव्हाण , संतोष मोगले , राजेंद्र सुरवसे , सोमनाथ आवताडे , नागेश डोंगरे , सुदर्शन यादव , विवेक खिलारे, दिगंबर यादव , सुनील रत्नपारखी , विश्वास चव्हाण , कपिल हजारे , अविनाश आठवले, सुशांत हजारे , महादेव धोत्रे , संजय माळी , संदीप यादव , अभय भालेराव , सागर साळुंखे , राहुल गवळी , अण्णा जाधव , निलेश क्षीरसागर , विजय चव्हाण, महेश जाधव , महेश जाधव , नाना जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते .