मंगळवेढा /प्रतिनिधी:-
घटस्थापनेच्या अनुषंगाने मंगळवेढा शहरात व परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मंगळवेढा पोलीस ठाणे कडून एकूण 17 मोटरसायकली मध्ये मॉडिफिकेशन, विना नंबर प्लेट, विना कागदपत्रे, असलेल्या मोटरसायकली ताब्यात घेण्यात आल्या होत्या.
सदर मोटरसायकली धारकांवर प्रचलित कायद्यानुसार कारवाई करणे करिता प्रादेशिक परिवहन विभाग, सोलापूर यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. सदरची कारवाई पूर्ण होतात सदरच्या मोटरसायकली मूळ मालकाच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवली आहे.
दरम्यान,सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवात पुन्हा अशा प्रकारच्या मोटरसायकली आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य व कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिला आहे.