शिवीगाळ दमदाटी प्रकरणी दामाजीचे उपाध्यक्ष तानाजी खरात वर गुन्हा दाखल

शिवीगाळ दमदाटी प्रकरणी दामाजीचे उपाध्यक्ष तानाजी खरात वर गुन्हा दाखल

मंगळवेढा (प्रतिनिधी):-

मुढवी ता मंगळवेढा येथे रक्तदान शिबिर भरवणाऱ्याना शिवीगाळी व दमदाटी करून जिवंत सोडणार नसल्याची धमकी देणाऱ्या बापु परमेश्वर बळछत्रे,खंडु सिद्धेश्वर माने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निघालेल्या नागरिकांवर पिस्तूल, तलवार, काठी कुऱ्हाड व दगडाने मारण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दामाजी कारखान्याचे व्हा चेअरमन तानाजी खरात, मुढवी सरपंच महावीर ठेंगील यांच्यासह 34जणांविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रानुसार मिळालेली माहिती अशी की लखन लहु रोकडे वय-25 वर्षे, धंदा शेती रा. मुढ़वी ता. मंगळवेढा यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की चालु वर्षी मुढवी येथे शिवजयंती उत्सव साजरा केलेला होता. दि. 20फेब्रू24 रोजी शिवजयंती मिरवणुक उत्सव सुरु असताना गावामध्ये तानाजी लक्ष्मण खरात, महावीर शिवाजी ठेंगील व त्यांच्यासोबत् इतर लोकांनी शिवजयंती मध्ये अडथळा निर्माण केलेला होता त्यावरून आमचे गावात सामाजिक सलोखा बिघडलेले होता परंतु त्यावेळी वाद नको म्हणून पोलीस ठाणेस तक्रार दिलेली नव्हती.दि.30 जुलै2024 रोजी रात्रौ 10 वा. आम्ही गावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव अनुषंगाने 01ऑगस्ट/2024 रोजी गावात रक्तदान शिबीर आयोजित करण्याबाबत गावातील गणपती मंदिराच्या कट्यावर बबन रोकडे, चंद्रकांत कदम, नवनाथ रोकडे, अमोल रोकडे आदी व इतर लोकांसोबत विचार विनिमय मिटींग चालु असताना गावातील बापु परमेश्वर बळछत्रे हा त्याचे मोटारसाईकल होंडा कंपनीची ड्रिम युगा तिचा आर.टी.ओ. नं- MH/13/BT8936 यावरुन येवुन मोटारसाईकलची रेस करु लागला व सर्वांना शिवीगाळ करत असताना त्याचा दुसरा साथीदार खंडु सिद्धेश्वर माने हा पण बजाज प्लेटीना कंपनीची -MH/13/DH-7462 यावर आमची मिटींग जेथे चालु होती तेथे आला आणि तुम्ही गावात रक्तदान शिबीर भरवायचे नाही असे म्हणून आंम्हास शिवीगाळी दमदाटी चालु केली. 
त्यावेळी आम्ही त्या दोघांना समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते आमचे काही एक न एकता आम्हा सर्वांना शिवीगाळी करून तुम्ही गावात रक्तदान शिबीर घेतले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर आम्ही मंगळवेढा पोलीस ठाणे येथे फोन केला त्यानंतर ते तेथुन पळुन गेले त्यानंतर मंगळवेढा पोलिस ठाण्याकडे मिटींग घेणारे वरील सर्वजण पोलीस ठाणेस जात असताना.

 त्यावेळी म्हासोबा देवस्थान जवळ असता तानाजी लक्ष्मण खरात, महावीर शिवाजी ठेगील, तेजस तानाजी खरात, मनोज चंद्रकांत ठेंगील, अमोल चंद्रकांत ठेंगील, प्रकाश तुकाराम ठेंगील, उमेश दत्तात्रय ठेंगील, सुजित निवृत्ती कोळेकर, अजित निवृत्ती कोळेकर, तानाजी मनोहर रोकडे, दिपक दत्तात्रय रोकडे, नानासाहेब गणपत शिंदे, स्वप्नील दत्तात्रय रोकडे, राहुल दिलीप कांबळे, सागर खांडेकर, प्रविण अंकुश ठेंगील, अतुल सुभाष ठेंगील, प्रशांत श्रीमंत ठेंगील, समाधान अंबादास जाधव, प्रविण पवार, पंडित हनुमंत ठेंगील, गणेश दशरथ कदम, दत्ता लवटे, संदिप डांगे, अविनाश वसंत कोळेकर, उल्हास डांगे, चांगदेव विठ्ठल मानें, बिरुदेव पांडुरंग ठेंगील, प्रकाश महादेव कोळेकर सर्व रा. मुढ़वी ता. मंगळवेढा जि. सोलापुर महादेव इरकर, रवी पाटील, अनिकेत दत्तात्रय गायकवाड तिघे रा. मंगळवेढा ता. मंगळवेढा हे सर्व अचानक आमचे समोर आले त्यावेळी सरपंच महावीर शिवाजी ठेंगील यांच्या जवळ पिस्टल उमेश ठेगील याचे हातात तलवार , तसेच इतरांच्या हातात काठ्या, दगड होते.

 त्यावेळी चंद्रकांत सखाराम कदम, यानी गेलेल्या पोलीस गाडीतील पोलीसांना फोनकरन आमचे वरती तक्रार दाखल करू नका असे म्हणून काही लोक गावटी पिस्टल, काठ्या व हातात दगड घेवुन येवून रस्त्यावर आमेच समोर उभे
 असुन शिवीगाळ करण आंम्हाला मारहाण करण्याच्या तयारीत सांगितले.त्यावेळी तातडीने पोलीस गाडी आल्याने सदरचे लोक तेथून पळुन जात असताना एक तलवार, दोन काठ्या हे त्याठिकाणी टाकुन गेले असल्याची फिर्याद मंगळवेढा पोलिस ठाण्यात दाखल झाली असून मंगळवेढा पोलिसांनी याप्रकरणी वरील 34 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पो.नि महेश ढवाण यांनी दिली. 
----------------------------------------------------------------------------
चौकट :-
मुढवी येथे गेल्या अनेक वर्षांपासून काही लोकांची दहशत असून अनेक निवडणुका व इतर वेळी ही दहशत नागरिकांनी व तालुक्याने अनुभवली आहे.चालू वर्षी शिवजयंती साजरी करण्याला व रक्तदान शिबिराला या संकुचित वृत्तीच्या लोकांनी विरोध केल्याने नागरिकांनी या प्रवृत्ती विरोधात आवाज उठवला असल्याने ही घटना घडली.तसेच या प्रकरणी दोषी वर गुन्हा दाखल होण्यासाठी मुढवी गावातील दीडशे महिला,दोनशे ते तीनशे युवक अशी चारशे ते पाचशे नागरिक मंगळवेढा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते.गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व नागरिक परतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.