ठेकेदार जोमात रास्ता मात्र एक महिन्यात कोमात, नगरपरिषद अभियंत्या समोर हलगीनाद

ठेकेदार जोमात रास्ता मात्र एक महिन्यात कोमात, 
     नगरपरिषद अभियंत्या समोर हलगीनाद 

मंगळवेढा/ प्रतिनिधी :-

            सांगोला नाका ते बोराळे नाका रस्ता करून एक महिना सुद्धा झाला नसताना सदरील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत . गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा रस्ता एका महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आला परंतु या रस्त्यामध्ये अद्याप बऱ्याच सुधारणा बाकी आहेत या तात्काळ पूर्ण कराव्या व एका दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवावे याकरता नगरपरिषद अभियंता समोर हलगी नाद करत आंदोलन करण्यात आले .

     सदरील रस्त्याला आमदार समाधान दादा अवताडे यांच्या माध्यमातून 2.25 कोटी रुपये निधी देण्यात आला होता. सदरील निधीचा योग्य तो विनिमय झालेला नसून नाव खराब करण्याचे काम ठेकेदाराकडून झालेले आहे . कोट्यावधी रुपये निधी आणायचा व तो ठेकेदाराकडून योग्य काम न करता वापरायचा असा प्रकार मंगळवेढा नगरपरिषद मध्ये दिसून येत आहे . यामध्ये मंगळवेढा नगरपरिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपने दिला आहे . मंगळवेढा शहरकरिता आमदार समाधान दादा अवताडे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आलेला आहे . सदरील निधीच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून ठेकेदार मुद्दाम काम व्यवस्थित करत नाहीत . नगरपरिषद प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून ठेकेदाराकडून उत्कृष्ट पद्धतीचे काम करून घेतले पाहिजे. सदरील सांगोला रोडवरील खड्डे एका दिवसात बुजवण्यात यावे व ठेकेदारास कायदेशीर दंड करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली , अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे .

      यावेळी भाजप शहराध्यक्ष नागेश बापू डोंगरे  , भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव ,  शहराध्यक्ष सुशांत हजारे  , तालुका सरचिटणीस कपिल हजारे  , शहर सरचिटणीस अजित लेंडवे ,  मनसेचे राजवीर हजारे ,  कृष्णा ओमने आदी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.