रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे आवश्यक; शिवसेनेने दिला रुग्णालयांना इशारा

रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे आवश्यक; शिवसेनेने दिला रुग्णालयांना इशारा


मंगळवेढा(प्रतिनिधी):-

प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावणे आवश्यक आहे. आगामी १५ दिवसांत हे सर्व लावावेत अन्यथा या रुग्णालयाना शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयाना दिला आहे शिवसेना (उबाठा)शहरप्रमुख दत्तात्रय भोसले यांनी याबाबत निवेदन प्रांताधिकारी यांना दिले
या निवेदनात त्यांनी लिहले आहे की सर्दी, ताप, खोकला आल्यानंतर रुग्ण खासगी रुग्णालयात जातात. तेथे गेल्यावर त्यांच्या रक्त, लघवी आदी तपासण्या केल्या जातात. आजार छोटा असतानाही एवढ्या तपासण्या का, असा सवाल रुग्ण उपस्थित करीत असतात, परंतु वरुन साधा दिसणारा आजार तपासणी केल्यावर मोठा असल्याचे उघड होत असते. तसेच अनेकदा डॉक्टरांनी काहीच तपासणी न करताही जास्तीचे पैसे घेतल्याचे आरोप होतात. 

यामुळे वाद झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. रुग्ण किंवा त्यांचे नातेवाइक आक्रमक होत डॉक्टर किंवा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना मारहाण करतात.हे टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात दर्शनी भागातच दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावण्याची गरज आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनीभागात दरपत्रक व रुग्ण हक्क सनद लावणे बंधनकारक असून याची गंभीर दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे

यावेळी उ.भा.ठा.शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय भोसले, उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने ,शहर उपप्रमुख प्रतीक होडगे, समन्वयक गणेश कुऱ्हाडे आदीजन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.