एसटीचा पास आपल्या शाळेत उपक्रम

 एसटीचा पास आपल्या शाळेत उपक्रम

मंगळवेढा / प्रतिनिधी :-

यंदा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री माधव कुसेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थी पास प्रत्येक शाळेत जाऊन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा लाभ प्रत्येक शाळेने घेतलेला असून रा. प. मंगळवेढा आगाराने मंगळवेढा शहर व तालुक्यातील शाळांना भेटी देऊन विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय पासाचे वाटप केलेले आहे. 

यामध्ये मंगळवेढ्यातील इंग्लिश स्कूल, श्री संत दामाजी महाविद्यालय, श्री संत दामाजी हायस्कूल, जवाहरलाल शेतकी हायस्कूल, नूतन मराठी विद्यालय, महाराणी ताराबाई हायस्कूल, पार्वती ताड खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्ञानदीप प्रशाला, प्रायमा टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट तसेच तालुक्यातील श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर माचनूर, शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शरद नगर, कै. दत्ताजीराव भाकरे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, आंधळगाव, इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज भोसे, स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव, विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज,सलगर बु. इत्यादी शाळा-कॉलेजला भेट देऊन शालेय पासेसचे वाटप केले आहे.

 विभाग नियंत्रक श्री विनोदकुमार भालेराव व विभागीय वाहतूक अधिकारी श्री अजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा आगाराचे आगार व्यवस्थापक संजय भोसले, सहाय्यक वाहतूक अधीक्षक शरद वाघमारे, वाहतूक निरीक्षक योगेश गवळी तसेच इतर प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.