डॉक्टर ऋचा पाटील प्रकरणात आरोपी डॉक्टर सुरज याला शिक्षा झालीच पाहिजे यासाठी मंगळवेढा मेडिकल असोसिएशनचे निवेदन

डॉक्टर ऋचा पाटील प्रकरणात आरोपी डॉक्टर सुरज याला शिक्षा झालीच पाहिजे यासाठी मंगळवेढा मेडिकल असोसिएशनचे निवेदन

मंगळवेढा/प्रतिनिधी:-

     मंगळवेढा येथील आय एम ए, निमा, होमिओपॅथी, डेंटल, लॅब आणि फार्मासिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आज डॉक्टर ऋचा पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व सदस्य एकत्र आले होते.आरोपी सापडला असला तरी त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्याला शिक्षा झाल्यानंतरच ऋचाच्या आत्म्याला शांती लाभेल व त्यासाठी मंगळवेढा मेडिकल असोसिएशन या प्रकरणाचा कायम पाठपुरावा करत राहील व पाटील कुटुंबाच्या पाठीशी राहील अशी हमी दिली. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, निष्पक्षपणे चौकशी होऊन आरोपीला शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन मंगळवेढा-सांगोला पोलीस निरीक्षक, तहसीलदार व आमदार समाधान आवताडे साहेब यांना उद्या देण्याचे ठरले. 
यावेळी आय एम ए चे अध्यक्ष डॉक्टर मधुकर कुंभारे, निमाचे अध्यक्ष डॉक्टर अतुल निकम, होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर शाकीर सय्यद, डेंटल संघटनेचे डॉक्टर सचिन बनसोडे, निमा महिला फोरमच्या अध्यक्षा डॉक्टर प्रीती शिर्के डॉक्टर श्रीनिवास कोरुलकर, डॉक्टर सुरेश काटकर, डॉक्टर शरद शिर्के, डॉक्टर होनमाने, डॉक्टर लक्ष्मीकांत मर्दा, डॉक्टर अमित कांबळे, डॉक्टर मुकुंद महाजन, डॉक्टर सिद्राम बुरकुल, डॉक्टर डी जी शिंदे, डॉक्टर दत्तात्रय घोडके, डॉक्टर उदयसिंह दत्तू, डॉक्टर विजयसिंह दत्तू, डॉक्टर सिद्धार्थ शिंदे, डॉक्टर भीमराव पडवळे, डॉक्टर काशिनाथ वाले, डॉक्टर दत्ता क्षीरसागर, डॉक्टर नितीन आसबे, डॉक्टर समाधान टकले, डॉक्टर सदानंद माने, डॉक्टर प्रशांत नकाते, डॉक्टर सतीश डोके, डॉक्टर राहुल लवटे, डॉक्टर सुशांत माने, डॉक्टर कैलास नरळे, डॉक्टर स्मिता नडगेरी, डॉक्टर आसावरी घोडके, डॉक्टर तनुजा होनमाने ,डॉक्टर शबनम सय्यद,अजित राजमाने, शरण बिराजदार, दशरथ फरकंडे, दयानंद जाधव, संदीप जाधव, विजय क्षीरसागर, अजित मस्के, इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.