मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचा व्हॉट्सॲप धारकांना कारवाईचा इशारा

मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांचा व्हॉट्सॲप धारकांना कारवाईचा इशारा

मंगळवेढा/ प्रतिनिधी:-

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने दिनांक -16/03/2024 पासून ते 06/06/2024 रोजी पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चा निकाल दिनांक -04/06/2024 रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने कोणीही नागरिक सदर निवडणुक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या,जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स,स्टोरी,स्टेटस,डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत.

तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डी.जे. वाजणार नाहीत.तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये.

व्हॉटसअप ग्रुपचे एडमिन यांनी दिनांक -03/06/2024 ते दिनांक -06/06/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये ओन्ली एडमिन करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत जर एडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यांसह ग्रुप अडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.