भारतीय जनता पार्टी मध्ये शिरनांदगी गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश
मंगळवेढा/प्रतिनिधी:-
मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी ग्रामपंचायत या गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार मा.श्री.समाधान दादा आवताडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बहुसंख्य कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
सदरप्रसंगी आमदार महोदय यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
देशातील सर्वात मोठा राष्ट्रीय राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा पक्षाच्या व देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वावरील विश्वास अधिक दृढ होत आहे हे प्रवेशा दरम्यान अधोरेखित झाले आहे.
भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.शशिकांत नाना चव्हाण, विधानसभा अध्यक्ष श्री.राजेंद्र बापू सुरवसे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.सुदर्शन यादव, सोसायटी चेअरमन श्री.यशवंत खताळ युवक नेते श्री.शहाजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्री.राजू सुतार, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री.सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य श्री.समाधान खांडेकर आदी मान्यवर जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.